Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंगराज्यातील 16 जिल्ह्यात महिला स्पेशल हॉस्पिटल उभारणार, अजित पवार यांची मोठी घोषणा

राज्यातील 16 जिल्ह्यात महिला स्पेशल हॉस्पिटल उभारणार, अजित पवार यांची मोठी घोषणा

ताजी बातमी ऑनलाईन टीम
राज्याचे अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आघाडी सरकारचा (mahavikas aghadi) आज तिसरा अर्थसंकल्प विधानसभेत (Maharashtra Budget) मांडला. 2022-23 या आर्थिक वर्षासाठीच्या या अर्थसंकल्पात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्यावर विशेष भर दिला असून विकासाची पंचसूत्री मांडण्यात आली आहे.

यंदा राज्य सरकारने आरोग्य विभागासाठी 11 हजार कोटींची तरतूद केली आहे. तसेच कर्करोग व्हॅनसाठी 8 कोटींची तरतूद केली आहे. तसेच हिंगोली, वर्धा, यवतमाळ, बुलडाणा, सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, भंडारा, जळगाव, अहमदनगर, धुळे, सोलापूर, रत्नागिरी, औरंगाबाद आणि रायगड आदी 16 जिल्ह्यात प्रत्येकी 100 खाटांचे स्त्री रोग रुग्णालय स्थापन करण्यात येतील, अशी घोषणा अजित पवार यांनी केली. अजित पवार यांनी महिला स्पेशल हॉस्पिटलची घोषणा करताच सभागृहातील सदस्यांनी टेबल वाजवून त्याचे स्वागत केले.



आरोग्य क्षेत्रासाठीच्या घोषणा
कोरोनामुळे पंचसूत्री अर्थसंकल्पावर भर. 11 हजार कोटींचा निधी आरोग्य सेवांवर खर्च करण्याचे नियोजन आहे.

टाटा कॅन्सर रूग्णालयाला आयुर्वेदिक रूग्णालय उघडण्यासाठी रायगड खालापूर येथे 10 हेक्टर जमीन देण्यात येणार आहे. मुंबईतील पशुवैद्यकीय महाविद्यालयाला 10 कोटी देणार

पुणे जिल्ह्यात इंद्रायणी हे आरोग्य रिसर्च सेंटर उभारण्यात येईल. एकाच ठिकाणी संशोधन, रूग्णालय फिझीओथेरपी इत्यादी अश्या सेवा एकाच ठिकाणी असतील. हे देशातील सर्वात मोठं रिसर्च सेंटर असेल.

कोरोना काळात राज्यात वैद्यकीय ऑक्सिजनचा तुटवडा होता. 1400 मेट्रिक टन ऑक्सिजनची निर्मिती राज्य करू लागलं. राज्य याबाबत स्वयंपूर्ण झालं.

मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी शासकीय रुग्णालयात फेको ही आधुनिक उपचार पद्धती सुरु करण्याचे शासनाने ठरवले आहे. एकूण 60 रुग्णालयात ही थेरपी सुरु केली जाणार असून पहिल्या टप्प्यात 20 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होईल. राज्यातील 50 पेक्षा जास्त खाटा असलेल्या रुग्णालयांना यांत्रिक धुलाई संयंत्र आणि 30 खाटांवरील रुग्णालयांना स्वच्छता संयंत्र देण्यात येणार आहे.

कर्क रुग्णांवर वेळेत निदान उपचार होण्याकरिता, 8 आरोग्यमंडळांसाठी 8 मोबाइल कर्करोग निदान वाहनांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून 8 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणी महिला व नवजात शिशू रुग्णालय स्थापन करण्याचा निर्णय. अकोला आणि बीड येथे स्त्री रोग रुग्णालयाचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे

राज्यात 49 रुग्णालयांच्या बांधकाम दुरुस्ती व इतर कामासाठी 1,392 कोटी11 लाख रुपये किंमतीची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

वैद्यकीय शिक्षणाच्या विद्यार्थ्यांना इथेच वैद्यकीय शिक्षण मिळावे, याकरिता पदव्युत्तर शिक्षण क्षमतेत वाढ कऱण्याचा निर्णय सरकारने घेतला असून मुंबई येथे, सेंट जॉर्ज पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था, नाशिक येथील आरोग्य विज्ञान वैद्यकीय शिक्षण संस्था तर नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था स्थापन करण्यात येत आहे.

जालना येथे 365 खाटांचे प्रादेशिक मनोरुग्णालय स्थापन करण्यात येत आहे. या रुग्णालयाच्या बांधकामासाठी अंदाजे ६० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. 2022-23 या वर्षात आरोग्य विभागात कार्यक्रम खर्चाकरिता सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाला 3 हजार 183 कोटी रुपये प्रस्तावित आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -