युद्धाचे सावट, त्यात भडकणारे इंधन दर आणि महागाईच्या कचाट्यात सापडलेले सामान्य नागरिक यांच्यासाठी एक आनंदाची बातमी. महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी सीएनजीवरच्या व्हॅटमध्ये घट करण्याची घोषणा केलीय. अजित पवार म्हणाले की, युक्रेन आणि रशियाच्या युद्धाचा साऱ्या जगावर परिणाम होईल. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील महागाई वाढणार असल्याचे सांगितले आहे, असा उल्लेख करूनही त्यांनी महाराष्ट्रातील नागरिकांना सुखद धक्का दिला. सीएनजीवरील मूल्यवर्धित कर साडेतेरा टक्क्यांवरून तीन टक्के करायचा प्रस्ताव यावेळी मांडला. या निर्णयामुळे सरकारचा 800 कोटींचा महसूल बुडेल. मात्र, सर्वसामान्यांना मोठा फायदा होणार आहे. खरे तर पर्यावरण पूरक नैसर्गिक वायूचा घरगुती वापर होतो. त्याचा सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांनाही मोठा लाभ होतो. आता व्हॅटमध्ये कपात करण्याचा प्रस्ताव असल्याने त्याचा थेट सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीयांना मोठा फायदा होणार आहे. दरम्यान, आज अर्थसंकल्प मांडताना अजित पवारांची घोषणांचा बार उडवला.
राज्यात CNG होणार स्वस्त, अजित पवारांची मोठी घोषणा काय?
RELATED ARTICLES
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -