पुणे- बंगळूर महामार्गावर पाचवड फाटा नजीक असलेल्या नांदलापूर गावच्या हद्दीत दुचाकीवरील दोघेजण जागीच ठार झाले आहेत. अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत साताऱ्यातील अन्वर मुनीर पठाण (वय-42, रा. सदरबझार), सर्फराज अझाद शेख (वय -39, गुरूवार पेठ) अशी ठार झालेल्याची नावे आहेत.
घटनास्थळावरून व पोलिसांनी दिलेली माहिती अशी, राष्ट्रीय महामार्गावर सातारच्या दिशेला निघालेल्या दुचाकी क्रमांक (एमएच11-बीटी- 2801) अज्ञात वाहनाने धडक दिली. गुरूवारी रात्री 11.45 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघात एवढा भीषण होती की, सातारा शहरातील दुचाकीवरील दोघेही ठार झाले.
अपघाताची माहिती मिळताच कराड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहूल वरोटे, अपघात विभागाचे प्रशांत जाधव, खालीद इनामदार घटनास्थळी दाखल झाले अपघातातील दोघांनाही स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रूग्णालयात नेण्यात आले. अधिक तपास राहूल वरोटे करत आहेत.