Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंगप्रवाशांनो कृपया लक्ष असू द्या! रविवारी मेगाब्लॉक, जाणून घ्या वेळापत्रक

प्रवाशांनो कृपया लक्ष असू द्या! रविवारी मेगाब्लॉक, जाणून घ्या वेळापत्रक

तुम्ही रविवारी लोकलने प्रवास करण्याची योजना आखत असाल तर जरा थांबा. कारण रविवारी लोकलने प्रवास करणे तुम्हाला त्रासदायक ठरेल. कारण रविवारी तिन्ही रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. उपनगरीय रेल्वे मार्गावर रेल्वे रुळाची दुरुस्ती आणि तांत्रिक कामासाठी मध्य रेल्वे मार्गावर 13 मार्च 2022 रोजी म्हणजे रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हा मेगाब्लॉक मध्य रेल्वे मार्गावरील ठाणे ते कल्याण अप आणि डाऊन मार्गावर आणि पश्चिम रेल्वेच्या सांताक्रुझ ते गोरेगाव अप आणि डाउन धीम्या मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे

रविवारी मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण दरम्यान दोन्ही जलद मार्गावर आठ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे लोकल उशिराने धावतील. या मेगाब्लॉकमुळे जलद मार्गावरील लोकल ठाणे ते कल्याण दरम्यान धीम्या मार्गावर चालवण्यात येणार आहेत. या स्थानकांदरम्यान दोनच मार्ग उपलब्ध असल्याने लोकल 10 ते 15 मिनिटं उशिराने धावणार आहेत. त्यामुळे प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 8.16 ते सायंकाळी 4.17 या वेळेत सुटणाऱ्या डाऊन जलद सेवा ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान थांबणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावर त्यांच्या संबंधित वेळापत्रकानुसार थांबवल्या जातील. या सेवा त्यांच्या नियोजित आगमनापेक्षा 10 मिनिटे उशिराने गंतव्यस्थानावर पोहोचतील. तर कल्याण येथून सकाळी 8. 40 ते सायंकाळी 4.58 पर्यंत सुटणाऱ्या अप जलद/अर्ध जलद सेवा कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. या सेवा त्यांच्या नियोजित आगमनापेक्षा 10 मिनिटे उशिराने गंतव्यस्थानावर पोहोचतील.

हार्बर रेल्वे मार्गावर कुर्ला ते वाशी दोन्ही मार्गावरही मेगाब्लॉक आहे. मेगाब्लॉकमुळे सीएसएमटी ते वाशी, बेलापूर पनवेल दरम्यान सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.34 ते दुपारी 3.54 या वेळेत वाशी/बेलापूर/पनवेल करीता सुटणारी हार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी 10.16 ते दुपारी 3.47 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. तथापि, ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि कुर्ला तसेच पनवेल आणि वाशी दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी 10 ते सायंकाळी 4.30 वाजेपर्यंत मेन लाइन आणि ट्रान्स हार्बर मार्गावरून प्रवास करण्याची परवानगी आहे.

रेल्वे रूळ सिग्नल यंत्रणा आणि ओव्हरहेड वायरच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी पश्चिम रेल्वे मार्गावर सांताक्रुझ ते गोरेगाव दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रविवारी सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत ब्लॉक घेऊन विविध कामे केली जाणार आहेत. धीम्या मार्गावरील लोकल या दोन स्थानकादरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येतील.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -