हॉटेलमध्ये जेवल्यानंतर तंबाखू खाण्यासाठी चुना मागण्यावरून विकास नाथाजी कुंभार याची व जितेंद्र केरबा खामकर या दोघांची बुरंबाळी येथील हॉटेलमध्ये वादावादी झाली. यातून एकाचा खून केल्याची घटना कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्याच्या धामोड येथे घडली.
हा वाद मिटवण्यासाठी जितेंद्र खामकर याने मामा अनिल रामचंद्र बारड याला बोलावून घेतले. व रात्री ११ वाजता ते दोघेजण कुंभारवाडी (ता. राधानगरी) येथे गेले. आरोपी विकास कुंभार याने जवळ असलेल्या धारदार चाकुने अनिल बारड यांच्यावर दोन वार केले. त्यांना उपचारासाठी कोल्हापूर येथे नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यु झाला.
WHO ची भीती खरी ठरलीच; डेल्टा आणि ओमायक्रॉन मिळून नवा व्हायरस तयार
मारेकरी विकास कुंभार याला राधानगरी पोलिसांनी ताब्यात घेतले असून आधिक तपास पोलीस निरीक्षक एस एस कोळी व पोलीस उपनिरीक्षक विजयसिंह कोळी हे करत आहेत. अनिल बारड हे कोल्हापूर जिल्हा संघात गोकुळ शिरगांव शाखेत मॅनेजर म्हणून काम करत होते. दरम्यान धामोड येथे झालेल्या घटनेचा निषेध म्हणून आठवडी बाजार बंद करण्यात आल्याचे धामोड प्रशासनाने घेतला आहे.