Sunday, December 22, 2024
Homeराजकीय घडामोडीसंजय राऊतांनी आता रशिया- युक्रेन मध्ये मध्यस्थी करावी; मनसेचा खोचक टोला

संजय राऊतांनी आता रशिया- युक्रेन मध्ये मध्यस्थी करावी; मनसेचा खोचक टोला

गोवा आणि उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत जोरदार वातावरण निर्मिती करूनही शिवसेनेची पुरती निराशा झाल्यानंतर याच पार्श्वभूमीवर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी आता रशिया आणि युक्रेन मध्ये मध्यस्थी करावी असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे.

इचलकरंजीत धूम स्टाईलने सोने लंपास

शिवसेना आता राष्ट्रीय पक्ष झाला, गोवा-उत्तर प्रदेशात घवघवीत यश मिळालं. आता राऊत साहेबांनी आंतरराष्ट्रीय राजकारणात गेलं पाहिजे. त्यांनी युक्रेन-रशियात मध्यस्ती केली पाहिजे, त्यातून मार्ग काढला पाहिजे असा खोचक टोला संदीप देशपांडे यांनी लगावला. तसंच धोरण राष्ट्रीय आणि लक्ष गल्लीत असं होत नाही. डोळा महानगरपालिकेवर आणि पक्ष राष्ट्रीय असं होत नाही. ही जी वीरप्पन गँग ज्या पद्धताने महानगरपालिका चालवतेय त्यामुळे मुंबईला देशात बदनाम केलं आहे असा आरोपही त्यांनी केला.

दरम्यान, गोवा आणि उत्तरप्रदेशात शिवसेनेने आपले उमेदवार उभे केले होते, मात्र एकही जागेवर त्यांना विजय मिळवता आला नाही. संजय राऊत हे सातत्याने शिवसेनेच्या विजयाचे दावे करत होते मात्र त्याना यश आले नाही. गोव्यात तर शिवसेनेला नोटापेक्षाही कमी मते मिळाली आहे. त्यामुळे विरोधक शिवसेनेची खिल्ली उडवत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -