Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्रभाविकांच्या गाडीवर काळाचा घाला, 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू

भाविकांच्या गाडीवर काळाचा घाला, 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू

अहमदनगर  येथून देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या गाडीवर  काळाने घाला घातला आहे. कर्नाटकातील गाणगापूर  येथून देवदर्शन करून अक्कलकोटच्या  दिशेने परत येणाऱ्या भाविकांच्या कारला भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर तीन लहान मुलं गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये चार महिलांचा समावेश आहे.शुक्रवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे. कर्नाटकातीलल अफझलपूर तालुक्यातल्या बळुर्गीजवळ ही घटना घडली आहे. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.

विवाहितेचा छळ : पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल

मिळालेल्या माहितीनुसार, अहमदनगर  येथील काही भाविक कुटुंबीयांसह अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात दर्शन करून कर्नाटक राज्यातील गाणगापूर येथील श्री दत्ताचे दर्शन घेण्यासाठी निघाले गेले होते. दत्तगुरुचे दर्शन घेऊन ते परत अक्कलकोटच्या दिशेला परत येत होते. त्याचवेळी बळुर्गी गावाजवळ त्यांच्या कारला भीषण अपघात झाला. कारचा टायर फुटला आणि चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन धडकली. हा अपघात इतका भीषण होता की कारचा चक्काचूर झाला असून त्यामध्ये असलेल्या चार महिलांसह पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरण अफझलपूर पोलिस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अपघाताचा तपास घेत आहेत.

या अपघातामध्ये अहमदनगर येथील बाबासाहेब सखाराम वीर, कोमल बाबसाहेब वीर, राणी बाबासाहेब वीर, अनव्वा हिराबाई बडे, छाया बाबासाहेब वीर या पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर सायली बाबासाहेब वीर, चैताली सूर्यवंशी आणि ममनी हे तिघेजण जखमी झाले आहेत. जखमींवर अफझलपूर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणाचा तपास अफझलपूर पोलिस करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -