गोपनीय माहिती लीक केल्याप्रकरणी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. यासंदर्भात आज पत्रकार परिषद घेत हे नेमकं प्रकरण काय आहे, आणि केवळ सूडापोटी आपल्यावर FIR दाखल केल्याचा आरोप फडणवीस याांनी केला आहे.
आज 12 मार्च आहे, मुंबई बॉम्ब स्फोट आजच्या दिवशी झाला होता. आज तीन दशकं झाल्यानंतर त्याचे घाव आपल्या मनावर कायम आहेत. एकीकडे 12 मार्च 1993 ला बॉम्बस्फोटात शहीद झालेल्या मुंबईकरांना श्रद्धांजली अर्पण करतो.
दुसरीकडे बॉम्बस्फोटाच्या आरोपींशी व्यवहार करणारे, जेलमध्ये जाऊनही महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात कायम आहेत. याबद्दल मी खंत व्यक्त करतो असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
मार्च 2021 मध्ये भाजपाच्या कार्यालयात एक पत्रकार परिषत घेऊन मविआ सरकारचा होम डिपार्टमेंटमधल्या बदल्यांचा महाघोटाळा बाहेर काढला होता. त्याचे पेन ड्राईव्ह, सर्व पुरावे माझ्याकडे आहेत.
हे पुरावे मी त्याच दिवशी देशातल्या होम सेक्रेटरीला सुपूर्द करतोय हेही मी सांगितलं होतं. त्याच दिवशी मी दिल्लीला गेलो आणि भारताचे होम सेक्रेटरी यांच्याकडे सर्व माहिती सादर केली. आणि त्यानंतर त्याचे गांभीर्य ओळखून न्यायालयाने या संदर्भातली सर्व चौकशी ही सीबीआयला सुपूर्द केली आहे,
या बदल्या घोटाळ्याची चौकशी सीबीआय करतेय, राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांचीही चौकशी सुरु आहे. अनेक महत्वपूर्ण बाबी समोर येत आहेत. पण राज्य सरकारने आपला घोटाळा दाबण्याकरता माझ्यावरच एक एफआयआर दाखल केला. ऑफिशियल सिक्रेट अॅक्टमधली माहिती लिक कशी झाली अशा प्रकारचा हा एफआयआर आहे. या संदर्भात मला पोलिसांच्या क्वेश्चनार पाठवण्यात आलं. याची माहिती मी देईन असं सांगितलं होतं.
विरोधी पक्ष नेता म्हणून ही माहिती कुठून आली याचा प्रश्न मला विचारला जाऊ शकत नाही. तथापी, मला पुन्हा क्वेश्चनार पाठवण्यात आलं आणि कोर्टात सांगण्यात आलं मी त्याचं उत्तर देत नाहीए.
काल मुंबई पोलिसांनी मला नोटीस पाठवली आहे. या बदल्यांच्या घोटाळ्यामध्ये त्यांनी दाखल केलेल्या एफआयआरच्या संदर्भात मला उद्या अकरा वाजता बीकेसीच्या सायबर पोलिस स्थानकात बोलावलं आहे.
जरीही मला प्रीव्हिलेज आहे आणि माझ्या माहितीचा स्त्रोत विचारला जाऊ शकत नाही. ही सर्व माहिती मी देशाच्या होम सेक्रेटरीला दिली आहे. जी माहिती बाहेर ती राज्यसरकारच्या मंत्र्यानी प्रेसला दिली. त्याचे पुरावे माझ्याकडे आहे.
तथापी मी स्वत: त्या ठिकाणी जाणार आहे, पोलीस जी काय चौकशी करतील त्याला योग्य उत्तर देणार आहे. पोलिसांनी चुकीची केस केलेली असली तरीही त्यांनी तपासात माझं सहाय्य मागितलं आहे, मी निश्चितपणे देईन,
माझा प्रश्न असा आहे की माहिती बाहेर कशी आली याचा तपास करण्यापेक्षा सहा महिने सरकारकडे हा अहवाल पडला होता, त्या अहवालात बदल्यांची सर्व सेन्सेटीव्ह माहिती असताना त्यावर सरकारने कोणतीही कारवाई झालेली नाही.
सर्वोच्च न्यायालायने ही सर्व माहिती सीबीआयला दिली. न्यायालयाने सीबीआयला दिली, त्यामुळे या केसला तशीही काही अर्थ नाहीए.
राज्य सरकारची आता जी परिस्थिती आहे, परवाचा जो षडयंत्राचा भांडाफोडी मी केलाय त्यामुळे राज्य सरकार आणि पोलिसातील काही अधिकारी त्यांना उत्तर सूचत नसल्याने मला नोटीस पाठवण्यात आली आहे, मी उपस्थित राहिन असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.