पडवी (ता. दौंड) येथे स्कूलबस व चारचाकी गाडीचा अपघात झाला. या दुर्घटनेत स्कूल बसमधील ७ वर्षांची विद्यार्थिनी जागीच ठार झाली. तर एक विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली. अवनी गणेश ढसाळ (वय ७) असे ठार झालेली विद्यार्थिनीचे नाव आहे. जखम मरिन तांबोळी पुणे येथे उपचारासाठी पाठवण्यात आले असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे यांनी दिली.
सुपे (ता. बारामती) येथील इंग्लिश मिडीयम स्कूल येथे विद्यार्थ्यांना घेऊन ही स्कूल बस जात हाेती. कुसेगाव ते पडवी येथे जाणाऱ्या अष्टविनायक महामार्गावर पडवी हद्दीत लागणाऱ्या उतारावर शनिवारी (दि. १२) सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. . या घटनेची माहिती मिळताच पाटस पोलीस चौकीचे सहायक पोलीस निरीक्षक केशव वाबळे, पोलीस समीर भालेराव व घनश्याम चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेतली.