सोलापूर-पुणे महामार्गावर कोंडी गावाजवळ वारकरी घेऊन निघालेल्या ट्रॅक्टरला भरधाव मालट्रकने ठोकरले. रविवारी रात्री पावणेअकराच्या सुमारास घडलेल्या या घटनेत चार वारकरी ठार, तर 17 जण जखमी झाले. हे सर्व जण उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूरनजीकच्या कदमवाडी गावचे रहिवासी आहेत.
12वीच्या विद्यार्थ्यांचा केमिस्ट्रीचा पेपर फुटला, मुंबईतील कोचिंग क्लासेसच्या शिक्षकाला अटक!
याबाबत माहिती अशी की, सोमवारी एकादशी आहे. त्यानिमित्त कदमवाडीचे सर्व वारकरी हे ट्रॅक्टरने रात्री जेवण करून विठ्ठल दर्शनासाठी उशीरा पंढरपूरला निघाले होते. हे सर्वजण कोंडीनजीक राहुटी येथे पोहोचले होते. या वेळी पुण्याला सिमेंट घेऊन निघालेल्या ट्रकचे टायर फुटले. त्यामुळे चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी ट्रॅक्टरवर जाऊन आदळली. त्यामुळे ट्रकने ट्रॅक्टरला मागच्या बाजूने सुमारे दीडशे फूट फरफटत नेले. त्यात ट्रॅक्टरच्या दोन्ही ट्रॉली पलटी झाल्या.
अपघात एवढा भीषण होता की, डिव्हायडर फूटून ट्रॅक्टरमधील वारकर्यांना ट्रकने अक्षरश: चिरडले. यामध्ये तीन वारकरी जागीच ठार झाले तर 17 जण गंभीर जखमी झाले अपघाताची माहिती मिळताच गावकरी व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.