Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंग12वीच्या विद्यार्थ्यांचा केमिस्ट्रीचा पेपर फुटला, मुंबईतील कोचिंग क्लासेसच्या शिक्षकाला अटक!

12वीच्या विद्यार्थ्यांचा केमिस्ट्रीचा पेपर फुटला, मुंबईतील कोचिंग क्लासेसच्या शिक्षकाला अटक!

राज्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून पेपर फुटीचे सत्र सुरुच आहे. सरकारी नोकरभरती पेपरफुटीचे प्रकरण ताजे असताना आता बारावीच्या बोर्डाचा पेपर फुटल्याचे प्रकरण  समोर आले आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांचा केमिस्ट्रीचा पेपर फुटल्याची  धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी मुंबईतल्या विलेपार्ले पोलिसांनी एकाला अटक केली आहे. या पेपरफुटी प्रकरणी मालाड येथील एका खासगी कोचिंग क्लासेसच्या शिक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे. या शिक्षकाने आपल्या कोचिंग क्लासेसमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना बारावी केमिस्ट्रीचा पेपर दिल्याची माहिती समोर आली आहे.

UPSC अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरू; त्वरित अर्ज करा

बारावीच्या केमिस्ट्री परीक्षेचा पेपर फुटल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. बारावीचा केमिस्ट्री विषयाचा पेपर 12 मार्चला म्हणजे शनिवारी झाला होता. पण परीक्षा होण्याआधीच हा पेपर विद्यार्थ्यांच्या मोबाइलवर आला होता. मालाडमध्ये खासगी कोचिंग क्लासेस चालवणाऱ्या शिक्षकाने आपल्या विद्यार्थ्यांना हा पेपर दिला असल्याची माहिती समोर आली. हा पेपर काही विद्यार्थ्यांच्या मोबाइलवर आला होता. याप्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी या कोचिंग क्लासेसचा शिक्षक मुकेश यादव याला अटक केली आहे. या शिक्षकाने चौकशीमध्ये पोलिसांना अशी माहिती दिली आहे की, ‘केमिस्ट्रीचा पेपप सुरु होण्यापूर्वीच आपल्या वर्गात शिकत असलेल्या तीन विद्यार्थ्यांना व्हॉट्सअ‍ॅपवर हा पेपर दिला होता.’

विलेपार्ले पोलिसांनी या प्रकरणी ज्या तीन विद्यार्थ्यांना व्हॉट्सअ‍ॅपवर पेपर दिला होता त्यांची चौकशी केली. या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरु आहे. पेपरफुटीसाठी मुकेश यादव या शिक्षकासोबत आणखी कोणाच सहभाग आहे का?, पेपर मिळवण्यासाठी काही आर्थिक व्यवहार झाला होता का?, याआधी सुद्धा पेपर फुटलेत का? या सर्वबाजूने पोलिसांकडून तपास सुरु आहे.
पोलिसांकडून या प्रकरणाची कसून चौकशी सुरू आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -