Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंगBreaking: 16 मार्च पासून 12 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांना मिळणार कोरोना...

Breaking: 16 मार्च पासून 12 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांना मिळणार कोरोना ची लस

कोविड- १९ पासून संरक्षणाबाबत आता केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ट्विट करून घोषणा केली आहे की, १६ मार्चपासून १२ ते १४ वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू होईल. मुलं सुरक्षित असतील तर देश सुरक्षित आहे, असं ट्विट त्यांनी केलं आहे.

त्यांनी ट्विटममध्ये म्हटले आहे की, १६ मार्चपासून १२ ते १३ आणि १३ ते १४ वयोगटातील मुलांचे कोविड लसीकरण सुरू होत आहे. तसेच, ६० वर्षावरील सर्व लोकांना आता खबरदारीचे डोस मिळू शकतील. मी मुलांचे कुटुंब आणि ६० वर्ष वयोगटातील लोकांना विनंती करतो की त्यांनी लस अवश्य घ्यावी.

मार्चच्या सुरुवातीलाच केंद्रीय मंत्री म्हणाले होते की देशातील १५ ते १८ वयोगटातील तीन कोटींहून अधिक किशोरवयीन मुलांचे कोविड-१९ लसीकरण पूर्ण झाले आहे. ते म्हणाले की, तरुणांच्या भारतातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम पुढील स्तरावर घेऊन जात आहे. मांडविया यांनी ट्विट केले होते की १५ ते १८ वर्षे वयोगटातील ३० दशलक्षांहून अधिक किशोरांना कोविड-१९ विरुद्ध पूर्णपणे लसीकरण करण्यात आले आहे. तरुण भारत जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम पुढील स्तरावर घेऊन जात आहे! सर्वाना मोफत लस.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -