Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंग‘राधेश्याम’ फ्लॉप ठरल्यामुळे प्रभासच्या चाहत्याने संपवलं आयुष्य

‘राधेश्याम’ फ्लॉप ठरल्यामुळे प्रभासच्या चाहत्याने संपवलं आयुष्य

‘बाहुबली’ फेम प्रभासचा जगभरात मोठा चाहतावर्ग आहे. त्याचा ‘’ ‘राधेश्याम ‘हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून प्रेक्षक-समीक्षकांकडून या चित्रपटाला फारसा सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. याचमुळे प्रभासच्या एका चाहत्याने आत्महत्या केली. आंध्रप्रदेशमधल्या कुर्नुल जिल्ह्यातील एका 24 वर्षीय चाहत्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. रवी तेजा असं या चाहत्याचं नाव आहे. रवी हा प्रभासचा खूप मोठा चाहता होता. प्रभासच्या ‘राधेश्याम’ या चित्रपटाला मिळत असलेल्या नकारात्मक प्रतिसादाला तो सहन करू शकला नाही, असं म्हटलं जातंय. गळफास घेण्यापूर्वी रवी त्याच्या आईसोबत या चित्रपटाविषयी बोलत होता. ‘राधेश्याम’ला मिळालेल्या नकारात्मक प्रतिसादाबद्दल तो त्याच्या आईशी बोलला. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

‘राधेश्याम’ हा प्रभासचा आणखी एक बिग बजेट चित्रपट आहे. जवळपास 300 कोटी रुपयांहून अधिक खर्च या चित्रपटावर करण्यात आला आहे. मात्र कथेच्या बाबतीत तो अपयशी ठरला, असं चित्रपट समीक्षकांचं म्हणणं आहे. असं असलं तरी बॉक्स ऑफिसवर चित्रपटाची कमाई चांगली होत आहे. राधा कृष्ण कुमार दिग्दर्शित या चित्रपटात प्रभाससोबत पूजा हेगडेची मुख्य भूमिका आहे. तर भाग्यश्री, सत्यराज, कृष्णम राजू, जगपती बाबू, सचिन खेडेकर, प्रियदर्शी, मुरली शर्मा, कुणार रॉय कपूर, जयराम यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -