Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंग12 ते 14 वयोगटातील मुलामुलींचं आजपासून लसीकरण, जाणून घ्या रजिस्ट्रेशन प्रोसेस

12 ते 14 वयोगटातील मुलामुलींचं आजपासून लसीकरण, जाणून घ्या रजिस्ट्रेशन प्रोसेस

राज्यभरात आज, बुधवारपासून (16 मार्च) 12 ते 14 वयोगटातील बालकांसाठी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू होणार आहे. राज्यात या वयोगटातील सुमारे 65 लाख बालके या लसीकरणासाठी पात्र आहे. या बालकांना कोर्बेव्हॅक्स लसचे दोन डोस 28 दिवसांच्‍या अंतराने दिले जाणार आहेत. मुंबईतील 12 केंद्रांवर 2 दिवस प्रायोगिक तत्त्वावर दुपारी 12 वाजल्यापासून लसीकरण सुरु होणार आहे. ही लस सर्वांना मोफत दिली जाणार असून त्यासाठी CoWIN अॅपवर रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे.

केंद्र सरकारच्या निर्देशानुसार, देशभरात 12 ते 14 या वयोगटातील मुलांसाठी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू करण्यात आले आहे. लहान मुलांना बायोलॉजिक ईएस कोर्बोवॅक्स कंपनीची लस दिली जाणार आहे. एनटीएजीआयने 12 ते 14 या वयोगटासाठी लसीकरण सुरू करण्याची शिफारस केली होती त्यानुसार केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून लहान मुलांच्या लसीकरण संदर्भात गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत. याबाबतीत गाईडलाईन्स सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आल्या आहेत.

मुले सुरक्षित असतील तर देश सुरक्षित आहेत, असे केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ट्वीट केले आहे 12 ते 13 आणि 13 ते 14 वयोगटातील मुलांचे कोरोना लसीकरण 16 मार्चपासून सुरू होणार आहे. त्याचबरोबर 60 आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या प्रत्येक नागरिकाला बूस्टर डोस देण्यात येणार आहे. देशभरात सुमारे 7.11 कोटी बालकांचे लसीकरण करण्यात येणार आहे.

काय आहेत गाईडलाईन्स..

– 2008, 2009 आणि 2010 मध्ये जन्मलेली मुले, त्यांच्यासाठी कोविड 19 लसीकरण सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
– लस सर्वांना मोफत दिली जाणार असून त्यासाठी CoWIN अॅपवर रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे.
– 12 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू केले आहे कारण त्यांना जास्त धोका आहे.
– प्रौढ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले असले तरी कोणतीही हलगर्जीपणा धोकादायक ठरू शकतो.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -