Tuesday, July 29, 2025
HomeयोजनानोकरीBreaking : मेट्रोमध्ये नोकरीची संधी; 2.60 लाखांपर्यंत वेतन!

Breaking : मेट्रोमध्ये नोकरीची संधी; 2.60 लाखांपर्यंत वेतन!

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी खूशखबर आहे. महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने (MMRC) नागपूर मेट्रो रेल्वे प्रोजेक्टसाठी विविध पदावर भरती प्रक्रिया सुरु केली आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना 33 हजार ते 2.60 लाख रुपयांपर्यंत पगार मिळणार आहे. इच्छुक उमेदवारांसाठी ही सूवर्ण संधी आहे. जाणून घेऊ या निवड प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती…

महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने (MMRC) नागपूर मेट्रो रेल्वे प्रोजेक्टसाठी अतिरिक्त महाव्यवस्थापक, सहमहाव्यवस्थापक, व्यवस्थापक, वरिष्ठ विभाग अधिकारी, लेखापाल आणि वरिष्ठ लेखापाल या पदांसाठी भरती प्राक्रिया राबवली आहे.

ऑनलाईन पद्धतीने करा अर्ज
मेट्रोमध्ये नोकरी करण्यास इच्छुक उमेदवारास ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी www.metrorailnagpur.com या अधिकृत संकेतस्थळाला भेट देत याठिकाणी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा.

ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी खुला प्रवर्गातील उमेदवारांना 400 तर राखीव प्रवर्गासाठी 100 रुपये शुक्ल द्यावे लागणार आहे. पण, लक्षात असू द्या, अर्ज करण्याची शेवटी तारीख 30 मार्च 2022 आहे. त्याआधी ऑनलाईन अर्ज सादर करावा.

16 पदांसाठी राबवण्यात येत आहे भरती प्रक्रिया
अतिरिक्त महाव्यवस्थापक, सह महाव्यवस्थापक, व्यवस्थापक, वरिष्ठ विभाग अधिकारी, लेखापाल आणि वरिष्ठ लेखापाल अशा एकूण 16 पदांसाठी ही भरती प्राक्रिया राबविण्यात येत आहे. या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता संबंधी माहिती
www.metrorailnagpur.com या अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आली आहे. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 50 वर्ष आहे. भरती प्रक्रियेदरम्यान निवड झालेल्या उमेदवारांना 33 हजार ते 2 लाख 60 हजार रुपयांपर्यंत वेतन मिळणार आहे. इच्छुक उमेवार 30 मार्च 2022 पर्यंत अर्ज करत संधीचा लाभ घेऊ शकतात. दरम्यान, ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर त्याची प्रत नागपूर रेल्वेकडे पाठवू नये.

अधिक माहितीसाठी मेट्रो भवन, महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड, VIP रोड दीक्षाभूमी जवळ, रामदेशपथ, नागपूर 440010 याठिकाणी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -