ताजी बातमी ऑनलाईन टीम
नुकत्याच पार पडलेल्या चार राज्यांच्या निवडणुकीत (state elections) भाजपला पुन्हा एकदा मोठं यश (BJP big victory) मिळालं आहे. त्यात उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा बहुमताचं सरकार आल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि योगी आदित्यनाथ यांचा करिष्मा कायम असल्याचे दिसून आले. अशातच आता महामंडलेश्वर स्वामींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी मोठी भविष्यवाणी केली आहे. मोदी 12 वर्ष पंतप्रधानपदी विराजमान राहतील असा दावा महामंडलेश्वर स्वामींनी केला आहे. महोबामध्ये स्वजन शिष्य संमेलन कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते.
महामंडलेश्वर स्वामी यतींद्र आनंद गिरी (Mahamandleshwar Swami Yatindra Anand Giri) यांनी ग्रह आणि नक्षत्रांचा दाखला देत 12 वर्षांपर्यंत नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान (PM Modi) राहतील असा दावा केला आहे. त्यानंतर राष्ट्रवादासाठी मोदी पंतप्रदानपदाचा त्याग करतील आणि योग्य व्यक्तीकडे पंतप्रधानपदाची सूत्रे सोपवतील असे देखील महामंडलेश्वर स्वामी यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी मोंदींचा उत्तराधिकारी (Modis successor) कोण असेल याबाबत देखील भविष्यवाणी (Prophecy) केली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेच मोदींचे उत्तराधिकारी असतील असा दावा त्यांनी केला आहे.
दरम्यान, उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वातील भाजपला मोठं यश मिळालं आहे. या विजयानंतर योगी आदित्यनाथ यांच्याकडे भविष्यातील पीएम मटेरियल म्हणून पाहिले जात आहे. राजकीय वर्तुळात देखील याविषीय दावे प्रतिदावे करण्यात येत आहेत. अशातच आता महामंडलेश्वर स्वामी यतींद्र आनंद गिरी यांनी देखील योगी आदित्यनाथ हे मोदींचे उत्तराधिकारी असतील अशी भविष्यवाणी (Anand Giri’s prediction about pm narendra modi) केल्याने तर्क वितर्कांना उधान आले आहे.