ताजी बातमी ऑनलाईन टीम
तंबाखूमध्ये निकोटीनसहीत (Nicotine) इतर ६० रासायनिक पदार्थ असतात. त्यांच्या नित्य सेवनाने कर्करोगासह (Cancer) इतर अनेक घातक रोग होऊ शकतात. एवढेच नव्हे धूम्रपान केल्याने तुमचे आयुष्यमान कमी होऊ धुम्रपान करणारा व्यक्ती हा एकाद्या निरोगी व्यक्तीपेक्षा १० वर्षे कमी जगतो, असा धक्कादायक निष्कर्ष जागतिक आकडेवारीरून समोर आला आहे.
नियमित धूम्रपान केल्याने आरोग्याच्या अनेक गंभीर समस्या (Health Problems) उद्भवतात. यामुळे अकाली मृत्यूही येतो. दररोज धूम्रपान करणे म्हणजे कर्करोग, फुफ्फुसांच्या आजारांना (Lung Disease) निमंत्रण देण्यासारखे आहे. या एका सवयीपासून आपण सुटका करून घेतली तर अकाली मृत्यूचा धोका (Risk Of Death) तर कमी होऊ शकतोच, शिवाय आयुष्य वाढण्यास मदत होते.
धूम्रपानामुळे फुफ्फुसांचे नुकसान इतर कोणत्याही प्रकारच्या कर्करोगापेक्षा फुफ्फुसांच्या कर्करोगामुळे (Lung Cancer) मृत्यू (Death) होणाऱ्यांची संख्या अधिक आहे. एका जागतिक अध्ययनावरून फुफ्फुसांच्या कर्करोगाच्या सुमारे ९०% उदाहरणांमध्ये नियमित धूम्रपान करणारे आढळून आले आहेत. फुफ्फुसांच्या कर्करोगाचे निदान झाल्यानंतर पाच वर्षांत पाचपैकी फक्त एक रुग्ण जिवंत राहिला आहे.
फुफ्फुसांच्या समस्या टाळा गेल्या दशकात क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (सीओपीडी) चे रुग्ण वेगाने पुढे आली आहेत. यासाठीही नियमित धूम्रपान हेच प्रमुख कारण आढळले आहे. सीओपीडी (COPD) हा फुफ्फुसासाठी धोकादायक आजार (Lung Disease) आहे. यात श्वास घेणे कठीण होते. यामुळे दीर्घकालीन अपंगत्व येण्याचे आणि मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक आहे. सीओपीडी या आजारात सुमारे ८५ ते ९०% रुग्ण ही नियमित सिगारेट ओढणारी आहेत. अमेरिकेत आजारांमुळे मृत्यू होण्यात हा आजार चौथे प्रमुख कारण मानला गेला आहे.