Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंगस्वाभिमानी पुन्हा भाजपसोबत युती करणार का ? राजू शेट्टींनी केला खुलासा

स्वाभिमानी पुन्हा भाजपसोबत युती करणार का ? राजू शेट्टींनी केला खुलासा

ताजी बातमी ऑनलाईन टीम

माजी खासदार राजू शेट्टी महाविकास आघाडीसोबत काडीमोड घेणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. २०१९ च्या लोकसभेच्या निवडणुकीवेळी राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. यामध्ये त्यांना हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून पराभवाला सामोरे जावे लागले. याचबरोबर राज्य सरकारने घटक पक्षांना जमेत न धरल्याने राजू शेट्टी नाराज असल्याची जोरदार चर्चा आहे.



विधानसभेच्या निवडणुकीवेळी महाविकास आघाडीची स्थापना करण्यात आली. यावेळी शेट्टींनी महाविकास आघाडीसोबत राहण्याचा निर्णय घेतला. परंतू मागच्या दोन वर्षात महाविकास आघाडीने राजू शेट्टी यांच्या मागण्यांना स्थान न दिल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याच्या तयारीत आहे. याबाबत राजू शेट्टी यांच्याशी चर्चा केल्यास ते म्हणाले की, ५ एप्रिल २०२२ ला राज्य कार्यकारिणीची बैठक घेण्यात येणार असून या बैठकीत पुढील निर्णय घेणार असल्याचे शेट्टींनी सांगितले.

शेट्टी पुढे म्हणाले की, मागच्या दोन वर्षात आम्ही महाविकास आघाडीकडून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला, पण महाविकास आघाडीने शेतकऱ्यांच्या प्रश्नांना केराची टोपली दाखवली. विज बिलासंदर्भातील प्रश्न असोत किंवा पुरग्रस्तांसाठी दिलेली तोकडी मदत यावरून आम्ही सरकारविरोधात वेळोवेळी आंदोलने करून ही त्यांनी शेतकऱ्यांनी पुरेसी मदत केली नाही, असे शेट्टी म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -