Wednesday, July 23, 2025
Homeइचलकरंजीइचलकरंजीतील घरफोडीचा गुन्हा उघड

इचलकरंजीतील घरफोडीचा गुन्हा उघड

ताजी बातमी ऑनलाइन टीम

घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले. याप्रकरणी रेकॉर्डवरील दोघांसह चौघांना जेरबंद केले. त्याच्याकडून साडेसात तोळ्याहून अधिकचे सोन्याचे दागिने आणि आलिशान मोटार असा आठ लाख ३३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. मोहन दौलतराव मुंडे (वय ३०), अमोल ऊर्फ देवा अशोकराव हेळबाळकर (वय ३०), राजेश श्रीकृष्ण साठे (वय २३) आणि बाबा बाबुराव गायकवाड (वय ३६, सर्व रा. अंबाजोगाई, बीड) अशी त्या संशयितांची नावे असल्याचे पोलिस निरीक्षक संजय गोर्ले यांनी सांगितले.



याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, इचलकरंजीतील जानकीनगर परिसरात मागील महिन्यात साडे पंधरा लाखांची घरफोडी झाली होती. या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने सुरू केला. दरम्यान पथकाला हा गुन्हा रेकॉर्डवरील संशयित मोहनने केला असून तो शिरोळ तालुक्यातील एका हॉटेलमध्ये येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून संशयित मोहन, अमोल, राजेश आणि बाबा अशा चौघा संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.


त्यांच्याकडून सात तोळे सात ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि आलीशान मोटार जप्त केली. संशयित मोहनवर दरोडा, घरफोड्या, अपहरण यासारखे २९ गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पुढे येत असल्याचे निरीक्षक गोर्ले यांनी सांगितले. ही कारवाई पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक गोर्ले, सहायक पोलिस निरीक्षक शिवानंद कुंभार, अमंलार रणजित पाटील, प्रशांत कांबळे, संजय इंगवले, महेश खोत सायबर सेलचे सुरेश राठोड, सचिन बेंडखळे यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -