Monday, January 6, 2025
Homeनोकरीआयबीआयमध्ये विनापरीक्षा मिळवा नोकरी, आत्ताच करा अर्ज

आयबीआयमध्ये विनापरीक्षा मिळवा नोकरी, आत्ताच करा अर्ज

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी  चालून आली आहे. रिझर्व बँक ऑफ इंडियाने  नुकतेच भरतीसाठी नोटीफिकेशन जारी केली आहे. विशेष मोहिमेअंतर्गत आरबीआयमध्ये विना परीक्षा रिक्त पदांवर भरती  केली जाणार आहे. अधिकृत अधिसूचनेनुसार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अहमदाबाद येथे ठराविक तासाच्या मोबदल्यासह कराराच्या आधारावर बँकेच्या वैद्यकीय सल्लागार पदावर नियुक्तीसाठी इच्छुक उमेदवारांना मुलाखतीला उपस्थित  राहण्याचे आवाहन केले आहे. या पदावर भरतीसाठी आवश्यक पात्रता असलेले उमेदवार 5 एप्रिल 2022 पर्यंत ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात.

या पदांच्या भरतीसाठी अर्ज करण्‍यासाठी अर्जदाराकडे मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाद्वारे मान्यताप्राप्त अ‍ॅलोपॅथिक सिस्टीम ऑफ मेडिसिनमधील कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान एमबीबीएस पदवी असणे आवश्यक आहे आणि कोणत्याही क्षेत्रातील हॉस्पिटलमध्ये फिजिशियन म्हणून किंवा क्लिनिकमध्ये किमान दोन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.

आवश्यक पात्रता

अर्जदाराकडे मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया द्वारे मान्यताप्राप्त अॅलोपॅथिक सिस्टीम ऑफ मेडिसिनमधील कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान एमबीबीएस पदवी आणि वैद्यकीय व्यवसायी म्हणून कोणत्याही हॉस्पिटल किंवा क्लिनिकमध्ये मेडिसिनचा किमान दोन वर्षांचा अनुभव असावा.

मिळेल इतके मानधन

या पदांवर निवड झालल्या उमेदवारांना संपूर्ण करार कालावधीसाठी प्रति तास 1,000 (3 वर्षे) मानधन देण्यात येईल.

निवड प्रक्रिया

उमेदवारांची निवड मुलाखतीच्या आधारे केली जाईल. मुलाखतीनंतर निवडलेल्या उमेदवारांना बँकेचा वैद्यकीय सल्लागार म्हणून नियुक्त करण्यापूर्वी वैद्यकीय तपासणी, दस्तऐवज पडताळणी इत्यादींना सामोरे जावे लागेल.

अर्ज सुरू झालेली तारीख : 15 मार्च 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 5 एप्रिल 2022

नोकरीचे ठिकाण : अहमदाबाद

नोकरीचे राज्य : गुजरात

संस्थेचे नाव : भारतीय रिझर्व्ह बँक

आवश्यक पात्रता : पदवी आणि एमबीबीएस

(भरती इच्छुक उमेदवारांच्या सोयीसाठी ताजी बातमी मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या नोकरीविषयक माहिती आम्ही विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करून प्रसिद्ध करीत असतो. कोणतीही चुकीची माहिती प्रसिद्ध होऊ नये याची पूर्णपणे खात्री करण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने करत असतो. तरीही नजरचुकीने काही चुका होऊ शकतात. त्यामुळे उमेदवारांनी कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी कोणत्याही नोकरीची खात्री करूनच आपले अर्ज सादर करावेत. कोणतीही भरती किंवा कोणत्याही आर्थिक व्यवहाराबाबत ताजी बातमी जबाबदारी घेणार नाही.)

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -