Sunday, December 22, 2024
Homeकोल्हापूरKolhapur : कोल्हापुरात शिवकालीन ठेवा सापडला, पावनगडावरील ऐतिहासिक आड उजेडात

Kolhapur : कोल्हापुरात शिवकालीन ठेवा सापडला, पावनगडावरील ऐतिहासिक आड उजेडात

कोल्हापूर जिल्ह्यतील पावनगडावर शिवकालीन आड आढळून आला आहे. टीम पावनगडच्या मावळ्यांनी शोधमोहीम राबवत हा आड प्रकाशात आणला. गडावरील चौकोनी विहिरी जवळ असलेला हा आड काळाच्या ओघात बुजून गेला होता. मात्र आता त्यातील गाळ काढून या आडाची स्वच्छता करण्यात आली आहे.

किल्ले पावनगडावर शिवकालीन आड आढळून आला आहे. टीम पावनगडच्या मावळ्यांनी राबवलेल्या शोध मोहीमेदरम्यान हा आड आढळून आला.

गडावरील चौकोनी विहिरी जवळ असलेला हा आड काळाच्या ओघात बुजून गेला होता.

मावळ्यांच्या हाती हा शिवकालीन ठेवा लागल्यानंतर लगेचच या आड्याच्या स्वच्छतेला सुरुवता करण्यात आली. शिवप्रेमिंनी आडाची स्वच्छता करत त्यातील गाळ देखील काढला.

या आडाचे मुख्य वैशिष्ट म्हणजे हा आड तब्बल 50 फूट खोल असून, तळाच्या दिशेने अरुंद होत गेलेला आहे. या आडासोबतच शोधमोहिमेदरम्यान पावनगडावर आणखी काही ऐतिहासिक ठेवा उजेडात येऊ शकतो असा विश्वास टीम पावनगडच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -