Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंगCorbevax vaccination : 12 ते 14 वयोगटातील मुलांचे लसीकरण कालच्या खोळंब्यानंतर सुरळीत,...

Corbevax vaccination : 12 ते 14 वयोगटातील मुलांचे लसीकरण कालच्या खोळंब्यानंतर सुरळीत, Covin Appही व्यवस्थित

पुण्यात 12 ते 14 वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरळीत झाले आहे. कॉर्बेव्हॅक्स या लसीला कालपासून देण्यास सुरुवात झाली आहे. आज कोविन अॅप  सुरळीत झाले आहे. मात्र मुलांची संख्या मर्यादित आहे. 20 मुलांचे रजिस्ट्रेशन झाल्याशिवाय व्हायल फोडली जाणार नाही, अन्यथा चार तासानंतर लसीची परिणामकारकता संपणार आहे. दरम्यान, 12 ते 14 या वयोगटातील लसीकरण संथ गतीने सुरू आहे. मुलांचा प्रतिसाद नाही. काल 12 ते 14 या वयोगटातील मुलांच्या लसीकरणाचा पहिल्याच दिवशी खोळंबा झाला होता. अवघ्या 60 मुलांना लस मिळाली होती. कॉर्बेव्हॅक्स या लसीला कालपासून सुरुवात झाली. मात्र अनेक अडचणी होत होत्या.

कोविन अॅपवर नोंदणी होत नसल्याने लसीकरण खोळंबले होते आणि एका व्हायलमध्ये 20 डोस असल्याने 20 मुले जमा झाल्याशिवाय व्हायल फोडता येत नाही, ही एक समस्या काल पाहायला मिळाली. त्यामुळे पहिल्या दिवशी 29 केंद्रांवर लसीकरणाचे नियोजन करूनही 60 जणांना लस देण्यात आली.

कोविड संसर्गाचा मुलांना धोका लक्षात घेता सरकारने या वयोगटातील मुलांच्या लसीकरणाचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनीही ट्विट केले होते, की मुले सुरक्षित असतील तर देश सुरक्षित आहे. 12 ते 13 आणि 13 ते 14 वयोगटातील मुलांचे कोविड लसीकरण 16 मार्चपासून सुरू झाले तसेच 60 आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या प्रत्येकाला आता बूस्टर डोस मिळू शकणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -