बॉलिवूड चित्रपटांपेक्षा प्रेक्षकांमध्ये ओटीटीची क्रेझ खूपच वाढली आहे. ओटीटीवरील वेबसीरिज आणि चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडत आहेत. त्यामुळे या प्लॅटफॉर्मवर नवनवीन कोणत्या गोष्टी पाहायला मिळतील याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात. ओटीटीवरील प्रेक्षकांची क्रेझ लक्षात घेता आता अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करत आहेत. या यादीमध्ये आता बॉलिवूडची बेबो अर्थात अभिनेत्री करीना कपूर खानच्या नावाचा देखील समावेश होणार आहे. करीना कपूर लवकरच नेटफ्लिक्सच्या ‘मर्डर मिस्ट्री’ चित्रपटाद्वारे ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहे.
करीना कपूर ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार असल्याचे कळताच तिचे चाहते आनंदीत झाले असून त्यांच्यामध्ये तिच्या ‘मर्डर मिस्ट्री’ चित्रपटाबाबत कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे. करीना कपूरचा हा चित्रपट जपानी लेखक ‘केगो हिगाशिनो’ यांच्या ‘द डिव्होशन ऑफ सस्पेक्ट एक्स’ या कादंबरीवर आधारित आहे.
नेटफ्लिक्सने या प्रोजेक्टशी संबंधित एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये अभिनेत्री करीना कपूर, जयदीप अहलावत आणि सुजॉय घोष टेबलवर चित्रपटाची स्क्रिप्ट वाचताना दिसत आहेत. अभिनेत्री करीना कपूरने देखील तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओसोबतच करिनाने दोन फोटोही शेअर केले आहेत ज्यात ती, जयदीप, विजय आणि सुजॉय घोष एकत्र दिसत आहेत.