ओमायक्रॉनच्या नव्या stealth व्हेरिएंटची भीती पुन्हा जगभरात पसरली आहे. ओमायक्रॉनची लाट पूर्व आणि आग्नेय आशियामधून पश्चिम युरोपमध्ये परत आली आहे. गुरुवारी दक्षिण कोरियामध्ये ६.२ लाख नवीन रुग्ण आढळले. अमेरिकेनंतर कोणत्याही देशात एका दिवसात नोंदवलेली ही सर्वाधिक प्रकरणे आहेत.
गेल्या सात दिवसांत दक्षिण कोरियातून २४ लाख रुग्ण आढळले आहेत. या कालावधीत जर्मनीमधून १५ लाख, व्हिएतनाममधून १२ लाख, फ्रान्समधून ५.२ लाख आणि यूकेमधून ४.८ लाख रुग्ण आढळले आहेत. गेल्या वर्षी होळीनंतर भारतात प्रकरणांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली होती. पण, यावर्षीची कोरोना आकडेवारीत घसरण झाली. मागील वर्षी होळीनंतरचा अनुभव चांगला नव्हता.
जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, ओमिक्रॉनमुळे कोविडची नवीन लाट येण्याचा धोका आहे. पूर्व युरोपमध्ये याचा प्रसार होत आहे. यामुळेच आर्मेनिया, अझरबैजान, बेलारूस, जॉर्जिया, युक्रेन आणि रशियामध्येही कोविडची प्रकरणे दुपटीने वाढली आहेत. तर दक्षिणपूर्व आशियामध्ये, हाँगकाँग, दक्षिण कोरियामध्ये प्रकरणे आधीच वाढली आहेत. त्याचवेळी आयआयटी कानपूरच्या तज्ज्ञांनीही जूनपर्यंत चौथ्या लाटेच्या आगमनाबाबत सांगितले आहे.