मटन खवय्यांची दुकानात मोठी गर्दी, धुळवडीच्या दिवशी मटण खाण्याची परंपरा असल्याने महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गर्दी झाल्याचं चित्र आहे. त्याचबरोबर चिकन महाग झाल्याने अनेकांनी मटणाला पसंती दिली आहे. सकाळपासून मटण खवय्ये रांगेत उभे राहून मटण खरेदी करीत आहेत.
रंग पंचमीच्या दिवशी मटण चक्क 40 रुपयांनी महागले असून आज सकाळ पासूनच 700 रुपये किलोने मटण विकले जात आहे.परंतु 700 रुपये किलो मटण असतानाही सकाळ पासूनच खवव्यांच्या रांगा मटणच्या दुकानावर पाहायला मिळाल्या आहे.
2 ते 3 तासापासून रांगेत उभा राहून नागरिक मटण घेत आहेत.विरार पूर्व स्टेशन परिसरातील जय भवानी मटणाच्या दुकानां समोरची दुपारी 1 च्या सुमारास ची ही दृश्य आहेत.
कोरोनाच्या मागच्या दोन वर्षानंतर या वर्षी पहिल्यांदाच सण हा मोठ्या प्रमाणात साजरा होत असल्यामुळे नागरिक याचा आनंद घेत आहेत