Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंगकर्मण्येवाधिकारस्ते…! 'या' राज्यातील शालेय शिक्षणात श्रीमद्भगवद् गीतेचा सामावेश

कर्मण्येवाधिकारस्ते…! ‘या’ राज्यातील शालेय शिक्षणात श्रीमद्भगवद् गीतेचा सामावेश

शालेय विद्यार्थ्याना श्रीमद्भगवद् गीतेचे ज्ञान असावे, यासाठी गुजरात सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता शाळांमध्ये गीता शिकवली जाणार आहे. 6 वी ते 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय घेण्यात आलाय.

राज्य सरकारचे म्हणणे आहे की, विद्यार्थ्यांना गीतेमधील संस्कार आणि तत्वांबाबत आवड निर्माण व्हावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. गीतेला पाठ्यक्रमासोबतच प्रार्थना आणि इतर कार्यक्रमांमध्येही सामिल केले जाणार आहे.

गुजरात सरकारने नवीन शिक्षण धोरणाअंतर्गत श्रीमद्भगवद् गीता पाठ्यक्रमात शिकवली जाणार असल्याची घोषणा केली. हे धोरण 2022-23 पासून सुरू करण्यात येणार आहे.

पाठ्यक्रमाअंतर्गत शाळांमध्ये गीतेवर आधारीत विविध स्पर्धा आणि रचना जसे की, श्लोक, निबंध, नाटक, चित्रकला, प्रश्नउत्तरे आदींचे आयोजन करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना अभ्याससाहित्य प्रिंट, ऑडिओ आणि व्हुज्युअल फॉरमॅटमध्ये देण्यात येईल.

नवीन शिक्षण धोरणाअंतर्गत काही निश्चित सिद्धांत बनवण्यात आले आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांना भारताची समृद्ध प्राचिन आणि आधुनिक संस्कृतीची माहिती दिली जाईल.

सोबतच विद्यार्थ्यांना भारतीय परंपरा, सभ्यता, संस्कारांशी एकरूप होता येईल. या अभ्यासक्रमाचा पाठ्यक्रमात सामिल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -