Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्रबाबा IPS, मी PSI असल्याचे सांगत तरुणीला इम्प्रेस करणाऱ्या भामट्याला ओरिजनल 'बेड्या'

बाबा IPS, मी PSI असल्याचे सांगत तरुणीला इम्प्रेस करणाऱ्या भामट्याला ओरिजनल ‘बेड्या’

ताजी बातमी ऑनलाईन टीम
ढरपूर शहरातील एक मुलगी पोलीस भरतीची तयारी करत असताना आरोपीने आपण स्वत: पीएसआय आहे. तर माझे वडील आयपीएस अधिकारी आहेत. असे खोटे सांगून तरुणीला तुला पोलीस भरतीसाठी मदत करतो. असे आमिष दाखवून त्या मुलीशी व तिच्या घरातील लोकांशी संपर्क वाढवला. मुलीला खरे वाटावे म्हणून तो गणवेशात येत असे. वारंवार वेगवेगळया अधिकार्‍यांशी ओळख असल्याचे सांगून मुलीला व तिच्या घरच्यांना लग्नासाठी तयार केले.



मात्र, मुलीला आरोपीच्या वागण्याबाबत शंका आली. तिने चौकशी केली असता तो फसवणूक करत असल्याचे लक्षात येताच मुलीने थेट शहर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. आणि पोलीसांकडून या तोतया पीएसआयचा भांडाफोड झाला. रमेश सुरेश भोसले-भिसे (वय २२, रा. यलम्मा मंदिरा जवळ, आंबे ता.पंढरपूर) असे त्याचे नाव आहे. त्याच्यावर शहर पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे. न्यायालयाने ५ दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.



आरोपी रमेश भोसले याने आपण खरोखरच पीएसआय असल्याचे भासवण्याठी खाकी रंगाचा गणवेश, बेल्ट, कॅप, खेळण्यातील पिस्तूल आदी साहित्य सोलापूर येथून आणले. पोलीस अधिकारी असल्याचे बनावट पोलीस ओळखपत्र व बनावट आधारकार्ड देखील तयार करुन घेवून त्याचा उपयोग त्याने मुलीची व तिचे घरातील लोकांची फसवणूक करण्यासाठी केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -