Sunday, December 22, 2024
HomeमनोरंजनHeropanti 2 Trailer | Tiger Shroff पुन्हा एकदा करणार ‘हिरोपंती’

Heropanti 2 Trailer | Tiger Shroff पुन्हा एकदा करणार ‘हिरोपंती’

ताजी बातमी ऑनलाईन टीम

लॉकडाऊननंतर आता कुठं चित्रपटगृहांमध्ये चित्रपट प्रदर्शित करण्याची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे सध्या अनेक चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. तर अशातच बॉलिवूड चित्रपट हिरोपंती2 या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.



ट्रेलर पाहून अनेकांना चित्रपट प्रदर्शित केव्हा होणार याची उत्सुकता लागली आहे. या ट्रेलरवरून हे लक्षात येतं की, हिरोपंती2 मध्येही अभिनेता टायगर श्रोफ आपली हिरोपंती दाखवणार आहे. तसेच यामध्ये अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी असल्याचं पाहायला मिळत आहे. यामध्ये त्याचा जोकरची भूमिका असून तो या चित्रपटामधील खलनायक असल्याचं समजलं आहे.



त्याचप्रमाणे हिरोपंतीमध्ये मुख्य भूमिकेमध्ये अभिनेत्री (Kriti Sanon) होती. तर आता हिरोपंती 2 मध्ये मुख्य भूमिकेमध्ये सर्वांची आवडती अभिनेत्री तारा सुतारिया आहे.त्यामुळे प्रेक्षकांना कधी हिरोपंती 2 रिलीज होतोय याची उत्सुकता लागली आहे. हिरोपंती 2 हा चित्रपट 29 एप्रिल रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार असून, या चित्रपटाचं दिग्दर्शन अहमेद खान याने केलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -