ताजी बातमी ऑनलाईन टीम
डिजीटल पेमेंटच्या जगात पॉप्युलर Amazon Pay, PhonePe, Google Pay आणि Paytm सारख्या प्लॅटफॉर्मला आता मोठी टक्कर मिळणार आहे. टाटा ग्रुप डिजीटल पेमेंटमध्ये एन्ट्री करणार आहे. टाटा लवकरच यूनिफाइड पेमेंट इंटरफेस अर्थात यूपीआय पेमेंट अॅप लाँच करणार आहे. कंपनीला नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून (NPCI) यासाठी क्लियरेन्स मिळणार आहे. क्लियरेन्स मिळाल्यानंतर कंपनी आपली UPI सर्विस सुरू करू शकते.
टाटा ग्रुप देशात आपली स्वत:ची UPI बेस्ड डिजीटल पेमेंट सर्विस ऑफर करण्यासाठी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडे (NPCI) मंजूरी मागितली आहे. टाटा ग्रुपने NPCI ला थर्ड पार्टी अॅप्लिकेशन प्रोव्हाइडर्स (TPAP) रुपात काम करण्यासाठी अर्ज केला आहे. टाटा ग्रुप लवकरात लवकर ही सर्विस सुरू करण्याची योजना आखत आहे.
टाटा ग्रुप डिजीटल कमर्शियल यूनिट टाटा डिजीटलच्या माध्यमातून आपली UPI पायभूत सुविधा मजबूत करण्यासाठी आयसीआयसीआय बँकेशी (ICICI Bank) चर्चा करत आहे. यूपीआय पेमेंट प्लॅटफॉर्मला NCPI कडून मंजुरी मिळाली तर टाटा ग्रुप आपल्या ग्राहकांसाठी ई-कॉमर्स अनुभव वाढवण्यात मदत करेल.
टाटा ग्रुप आपलं डिजीटल पेमेंट App TATA Neu या नावाने लाँच करतील. पुढील महिन्यात आयपीएल (IPL 2022) दरम्यान टाटा ग्रुप आपलं App लाँच करू शकतं अशी माहिती आहे. टाटा डिजीटलबाबत 7 एप्रिल रोजी घोषणा केली जाऊ शकते.
दरम्यान, Google Pay ने एका दिवसासाठी अर्थात सिंगल डे ट्रान्झेक्शन लिमिट ठेवलं आहे. त्याशिवाय तुम्ही एका दिवसात किती रुपये ट्रान्सफर करू शकतात यावरही Google Pay ने लिमिट ठेवलं आहे. Google Pay वर तुम्ही एका दिवसात 1 लाख रुपयांपर्यंत पैसे पाठवू शकता. Google Pay वर एका दिवसात मॅक्सिमस 10 ट्रान्झेक्शन करतात येतात.