Sunday, December 22, 2024
Homeमहाराष्ट्रCorona : नागरिकांनो सावधान! कोरोना पुन्हा येतोय, केंद्र सरकारने सर्व राज्यांना दिला...

Corona : नागरिकांनो सावधान! कोरोना पुन्हा येतोय, केंद्र सरकारने सर्व राज्यांना दिला अलर्ट

संपूर्ण जगाच्या चिंतेत वाढ करणाऱ्या कोरोनाचा प्रभाव कमी होत चालल्यामुळे जगभरातील देशांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. पण आता याच कोरोनाने पुन्हा हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. काही युरोपियन आणि आशियामधील  देशांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जगभरातील सर्वच देशांच्या चिंतेत वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून हालचालींना वेग यायला सुरुवात झाली आहे. केंद्र सरकारने सर्व राज्यांना अलर्ट दिला असून आपली सुरक्षा कमी करु नका अशा सूचना दिल्या आहेत.

रशियन फौजांचा लवीव विमानतळावर हल्ला

राजेश भूषण यांनी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना लिहिलेल्या पत्रात असे देखील म्हटले आहे की, ‘नमुन्यांची वारंवार चाचणी करा जेणेकरुन कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची वेळेत माहिती मिळेल. तसंच लोकांनी लसीकरण करावे यासाठी प्रयत्न करण्यास सर्व राज्यांना सांगण्यात आले आहे. तसंच, ‘दक्षिणपूर्व आशिया आणि युरोपमधील काही देशांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वाढू लागल्यानंतर 16 मार्चला आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्र्याच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक पार पडली.

यावेळी राज्य तसंच केंद्रशासित प्रदेशांनी आक्रमक आणि शाश्वत जिनोम सिव्केन्सिंग तसंच नीट लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले, असे देखील राजेश भूषण यांनी या पत्रात सांगितले आहे. त्यासोबतच, सर्व राज्यांनी करोनाच्या नियमांचे पालन करण्यासाठी जनजागृती करण्याची गरज असून मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग, स्वच्छता यांची पुन्हा आठवण करुन दिली पाहिजे, असे देखील त्यांनी या पत्रात नमूद केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -