Thursday, July 24, 2025
Homeकोल्हापूरBreaking : कोल्हापूरचा पारा ४० अंशांकडे!

Breaking : कोल्हापूरचा पारा ४० अंशांकडे!

कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात शुक्रवारी उन्हाचा तडाखा वाढला. अंगाची लाहीलाही करणार्‍या उन्हाच्या झळांनी नागरिक अक्षरश: हैराण होऊन गेले. शहराचा पारा 40 अंशांकडे चालला आहे. आज 39.5 अंश इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली. यंदाच्या उन्हाळ्यातील हे आजवरचे सर्वाधिक तापमान आहे.

धक्कादायक : अल्पवयीन मुलीला दारू पाजून केला विनयभंग

चार दिवसांपासून तापमानात वाढ होत आहे. कमाल आणि किमान तापमानात वाढ झाल्याने हवेत उष्मा जाणवत आहे. गेल्या दोन दिवसांपासून सरासरी तापमानापेक्षा तीन अंशांनी पारा वाढला आहे. आजही तापमानातील वाढ कायम राहिली. सकाळपासूनच हवेत उष्मा होता. दुपारी तर उन्हाचे चटके अधिक जाणवत होते. अंगातून घामाच्या धारा निघाव्यात इतकी तीव्रता होती.

दुपारपासून वाढलेल्या उकाड्याने नागरिक अक्षरश: हैराण झाले होते. यामुळे कार्यालये, दुकाने आदींसह घराघरांत सकाळी अकरा वाजल्यापासूनच फॅन, एसी सुरू झाले होते. दुपारी वातावरण ढगाळ झाले. शहराच्या पश्चिमेकडील उपनगर परिसरात तर तीनच्या सुमारास मोठे ढग आले. यामुळे वादळी पाऊस होईल, अशी शक्यता होती. मात्र, काही वेळाने वातावरण निरभ्र  झाले.

शहर आणि परिसरातही दुपारनंतर जोराचा वारा सुटला होता. काही काळ वातावरणही ढगाळ होते. यामुळे पाऊस होईल, अशीच शक्यता होती. मात्र, सायंकाळपर्यंत पावसाने हुलकावणीच दिली. सायंकाळनंतरही हवेत उष्मा जाणवत होता. पुढचे दोन दिवस जिल्ह्याचा पारा 37 ते 38 अंशांदरम्यान राहील तसेच वातावरण ढगाळ राहील; मात्र पाऊस होणार नाही, अशीही शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -