एलपीजी (LPG) ग्राहकांसाठी एका महत्त्वाची बातमी समोर आली आहे. स्मार्टफोन किंवा इंटरनेट नसल्याने तुम्हालाही स्वयंपाक घरातील गॅस सिलेंडर बुकिंग करण्यासाठी अडचणी येत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी कामाची आहे. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने स्मार्टफोन किंवा इंटरनेट सुविधा नसलेल्या LPG ग्राहकांची अडचण लक्षात घेता त्यांच्या सुविधेसाठी ‘व्हॉइस’ आधारित डिजिटल पेमेंट सुविधा सुरू केली आहे. या सुविधेच्या माध्यमातून आता तुम्हाला गॅस बुकिंग तसेच पेमेंट देखील करता येणार आहे. या सुविधेसाठी BPCLने अल्ट्राकॅश टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेडसोबत भागीदारी केली आहे. त्यानुसार जाणून घेऊया काय आहे ही सुविधा…
UPI 123Pay या सेवेबाबत आरबीआयने म्हटले आहे की, फीचर फोन वापरकर्ते चार तांत्रिक पर्यायांवर आधारित अनेक प्रकारचे व्यवहार करू शकतात. यामध्ये प्रथम कॉलिंग इंटरएक्टिव्हव्हॉइस रिस्पॉन्स (IVR) , दुसरी अॅप कार्यक्षमता, तिसरी मिस्ड कॉल आधारित पद्धत आणि चौथी प्रॉक्सिमिटी व्हॉइस आधारित पेमेंट यांचा समावेश आहे. या सेवेद्वारे, वापरकर्ते मित्र आणि कुटुंबीयांना देखील पैसे पाठवू शकतात. यासह विविध युटिलिटी बिले भरू शकतात. वाहनांचे FASTAG रिचार्ज, मोबाइल बिल भरण्याची सुविधा देखील यात मिळणार आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) विकसित केलेली डिजिटल पेमेंट योजनेसाठी एक हेल्पलाइन देखील सुरू केली आहे. DigiSathi नावाच्या या हेल्पलाइनचा लाभ तुम्ही digitisathi.comया संकेतस्थळावरून घेऊ शकतात.