‘द बॅटमॅन’ चित्रपटाचा सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच बोलबाला सुरू आहे. या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर 500 मिलियन डॉलर्सचा गल्ला जमवला आहे. कोरोनाकाळात एवढी मोठी कमाई करणारा हा दुसराच चित्रपट आहे. ‘द बॅटमॅन’ सिनेमा 4 मार्च 2022 ला सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. ‘द बॅटमॅन’ हा हॉलिवूडचा सर्वाधिक लोकप्रिय चित्रपट आहे. मॅट रीव्स यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाची प्रेक्षक गेले अनेक दिवस प्रतीक्षा करत होते. या चित्रपटात रॉबर्ट पॅटिनसन अॅक्शन मोडमध्ये दिसत आहे. ‘बॅटमॅन ‘ मालिकेचे जगभरात चाहते आहेत.
पण या चित्रपटाशी संबंधित एक अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे, जी चित्रपट निर्मात्यांना आणि
प्रेक्षकांनाही आश्चर्यचकित करणार आहे. वास्तविक, मॅट रीव्ह्सच्या ‘द बॅटमॅन’ने जगभरातील बॉक्स ऑफिसवर 500 मिलियन डॉलर्स कमावले आहेत. वॉर्नर ब्रदर्सचा सुपरहिरो चित्रपट 2019 च्या जोक्विन फिनिक्स-स्टार ‘जोकर’ नंतरचा सर्वात मोठा हिट चित्रपट म्हणून समोर आला आहे. ‘बॅटमॅन’मध्ये रॉबर्ट पॅटिन्सन हा डीसी हिरो म्हणून दाखवण्यात आला आहे . यात जो क्रॅविट्झ, जेफ्री राइट, पॉल डॅनो आणि इतर अनेक कलाकार आहेत. हा चित्रपट 200 दशलक्षच्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता.