Monday, December 23, 2024
Homeतंत्रज्ञानतुमच्या मोबाईलमध्ये 'हे' अ‍ॅप असेल तर सावधान, नाही तर रिकामे होऊ शकते...

तुमच्या मोबाईलमध्ये ‘हे’ अ‍ॅप असेल तर सावधान, नाही तर रिकामे होऊ शकते तुमचे बँक अकाऊंट

तंत्रज्ञानाच्या या काळात मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यातच मोबाईल बँकिंगचा वापर देखील झपाट्याने वाढत आहे. अनेक कंपन्या अ‍ॅपच्या माध्यमातून युजर्सला ऑनलाईन बँकिंगची सुविधा देत आहे. तुम्ही सुध्दा ऑनलाईन बँकिंग किंवा पैशांचे इतर व्यवहार मोबाईल अ‍ॅपने करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. सध्या असे अनेक बनावट अ‍ॅप (Scam App) आहेत, ज्याच्यामुळे तुमचे बँक अकाऊंट रिकामं होऊ शकतं. सध्या असंच एक बनावट बँकिंग ट्रोजन अ‍ॅप एक Android फोनवरून समोर आले आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून लोकांची फसवणूक केली जात आहे.

या’ अ‍ॅपला गुगल प्ले स्टोअरवर बंदी –
एक Android फोनवरून समोर आलेल्या या बनावट बँकिंग ट्रोजन अ‍ॅपवरून पैशांची चोरी, बँकिंग घोटाळा, ऑनलाईन वॉलेट, इन्शुरन्स अ‍ॅप, क्रिप्टो वॉलेट्स, अ‍ॅप डेटा आणि पासवर्ड चोरीला जात आहे. धक्कादायक बाबा म्हणजे हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोअरवर होते. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात घेत गुगल प्ले स्टोअरवर या अ‍ॅपला बंदी घालण्यात आली आहे. ‘QR Code and Barcode-Scanner App’ असे या अ‍ॅपचे नाव असून जवळपास 10,000 हजार लोकांकडून हे अ‍ॅप डाऊनलोड करण्यात आले आहे.

अशी होते फसवणूक
क्लीफी या ऑनलाइन फसवणूक विरोधी व्यवस्थापन आणि प्रतिबंधक फर्मने दिलेल्या माहितीनुसार युजरचे ‘क्रेडिन्शिअल्स आणि एसएमएस’ चोरण्यासाठी ट्रोजनची रचना करण्यात आली होती. या अ‍ॅपने गुगल प्ले स्टोअरवरील युजर्सचे पैसे चोरले आहे. QR Code and Barcode-Scanner App वापरकर्त्यांना काही फायदे देण्यासाठी डिझाईन केले होते. त्यामुळे ते लोकप्रिय झाले. हे अ‍ॅप रिअल दिसत असले तरी प्रत्यक्षात ऑनलाईन स्कॅम अ‍ॅप होते. हे अ‍ॅप डाऊनलोड केल्यानंतर लगेच QR Code Scanner नावाचे दुसरे App डाऊनलोड कारण्याची परवानगी मागते.

या अ‍ॅपमध्ये अनेक मालवेअर समाविष्ट करण्यात आले होते. जे एकदा स्थापित झाल्यावर स्मार्टफोनची स्क्रीन नियंत्रित करत त्यानंतर लॉगिन तपशील, एसएमएस आणि द्विघटक प्रमाणीकरण कोड शोधत फसवणूक करत होते. तुमच्या मोबाईलमध्ये जर असे संशयित अ‍ॅप असेल तर त्वरित काढून टाका, जेणे करून तुमची फसवणूक होणार नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -