घरी निघालेल्या एका १२ वर्षीय अल्पवयीन मुलीला तोंड दाबून भररस्त्यातून घरी उचलून नेत गुंडाने तिच्यावर अत्याचार केला. याप्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी अस्लम शौकत शेख (वय २१, रा. जनता वसाहत) याला अटक केली आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अस्लम शेख हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. १७ मार्च रोजी रात्री मुलगी घरी जात होती.
यावेळी अस्लम शेख याने मुलीचे तोंड दाबून तिला ओढत जबरदस्तीने आपल्या घरात नेले. घरात तिच्यावर अत्याचार केला. दत्तवाडी पोलिसांनी शेख याला अटक केली असून, पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करीत आहेत.