Monday, December 23, 2024
Homeब्रेकिंगदहावीच्या विद्यार्थिनीचा विनयभंग, राष्ट्रवादीच्या नेत्याचं पोलिसात आत्मसमर्पण

दहावीच्या विद्यार्थिनीचा विनयभंग, राष्ट्रवादीच्या नेत्याचं पोलिसात आत्मसमर्पण

अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याच्या गुन्हात अडकलेला राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) नेता अखेर भंडारा जिल्ह्यातील आंधळगाव पोलिसांना शरण आला आहे. काल (रविवारी) रात्री उशिरा त्याने पोलिसात आत्मसमर्पण केले. तब्बल 23 दिवसांच्या कालावधीनंतर आंधळगाव पोलिसांना त्याने आत्मसमर्पित केले आहे. सुमेध श्यामकुवर असे आरोपी नेत्याचे नाव आहे. शरणागती पत्करल्यानंतर आंधळगाव पोलिसांनी त्याची वैद्यकीय तपासणी करत रात्री उशिरा त्याला अटकही केली. कोर्टासमोर आज त्याला हजर केले जाणार आहे. विशेष म्हणजे आरोपी महिन्याभरापासून अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात फेऱ्या मारत होता. मात्र भंडारा पोलिसांच्या जामिनावर हरकत घेण्याच्या अॅफिडेविटमुळे त्याचा जामीन अर्ज रद्द झाला. अखेर सुमेध श्यामकुवर याने आंधळगाव पोलिसांना आत्मसमर्पित केले आहे.

भंडारा वसतिगृहात राहणाऱ्या इयत्ता दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाला होता. राष्ट्रवादीचा नेता आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुमेध श्यामकुवर याने हॉस्टेलमध्ये नेण्याच्या बहाण्याने आंधळगाव पोलीस स्टेशन हद्दीतील डोंगरगाव विहीरगाव रोडच्या शिवारात आपली कार थांबून विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची घटना 25 फेब्रुवारीला सायंकाळी घडली होती.

दरम्यान 26 फेब्रुवारीला आंधळगाव पोलीस स्टेशनला फिर्यादीच्या तक्रारीवरून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुमेध शमकुवर यांच्यावर पॉस्को कलम आठ आणि 354 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्यानुसार त्यांची गाडी क्रमांक MH 36H7009 मारुती सुझुकी वॅगनआर ही आंधळगाव पोलिसांनी भंडारा येथून जप्त केली. या प्रकरणी आंधळगाव पोलिसांनी तपास करत मुलीच्या फिर्यादीवरुन ठाणेदार सुरेश मटामी यांनी कलम 354 आणि पॉस्को 8 नुसार गुन्हा नोंद करून आरोपीचा शोध घेत होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -