मुंबई, पुणे, नाशिकमधील रहिवासी भागात बिबट्या (Leopard) घुसल्याच्या घटना अनेक वेळा ऐकायला मिळतात. पुणे-कोल्हापुरात गेल्या काही दिवसांपासून गव्यांचंही दर्शन होताना दिसत आहे. नुकतंच पुण्यात (Pune) व्यावसायिक भागात बिबट्या शिरल्याचा प्रकार समोर आला आहे. पुण्यातील मर्सिडीज बेंझ (Mercedes Benz) कंपनीत बिबट्या घुसल्याची माहिती समोर आली आहे. कंपनीतील कामगारांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं आहे. बिबट्याचं बचावकार्य अद्यापही जारी आहे. वन्यधिकारी, पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून बिबट्याला बाहेर काढण्याचं काम सुरु आहे.
पुण्यातील मर्सिडीज बेंझ कंपनीत बिबट्या घुसला आहे. त्यानंतर कंपनीतील कामगारांना बाहेर काढण्यात आलं. बिबट्याला बाहेर काढण्याचं काम अद्यापही जारी आहे. वन्यधिकारी, पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून बिबट्याचा शोध घेतला जात आहे.