संपामुळे उन्हाळी हंगाम हातातून निसटून जाऊ नये, यासाठी एसटी महामंडळाने 11 हजार कंत्राटी चालकांची भरती करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. येत्या तीन दिवसांत मनुष्यबळ पुरवणार्या संस्थेच्या नियुक्तीसाठी निविदा काढण्यात येणार आहे. त्या कंपनीकडून प्रत्येक जिल्ह्यात आवश्यकतेनुसार कंत्राटी चालक घेण्यात येणार आहेत. याआधी महामंडळात 1 हजार 750 कंत्राटी चालक घेतले आहेत.
संपात चालक-वाहक मोठ्या प्रमाणात सहभागी आहेत. त्यामुळे महामंडळाने आता कंत्राटी चालकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या आवश्यकतेनुसार कंत्राटी चालक घेण्यात येणार आहेत. येत्या आठवड्यापासून हे कंत्राटी चालक एसटीत येतील, अशी माहिती एसटीतील एका वरिष्ठ अधिकार्याने दिली. सध्या एसटीच्या एकूण कर्मचार्यांची संख्या 81 हजार 683 असून त्यातील 31 हजार 234 कर्मचारीच कामावर आहेत.
महामंडळाने कंत्राटी चालकांची भरती करण्यावर भर दिला आहे. परंतु, वाहकांचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. परंतु सध्या चालक आणि वाहक अशी दोन्ही कामे करणार्या कर्मचार्यांना वाहकाची जबाबदारी देण्यात येणार आहे.