१९९० च्या दशकात झालेल्या काश्मिरी पंडितांच्या पलायना वरती परखड भाष्य करणारा आणि देशभरात गाजत असलेल्या द काश्मीर फाईल्स हा चित्रपट गडहिंग्लज मधील सुभाष टॉकीज मध्ये गडहिंग्लज भाजपाच्या वतीने मोफत दाखविण्यात आला. भारताच्या स्वातंत्र्यानंतरच्या सत्तर वर्षांत पूर्वीच्या सरकारला जे जमले नाही ते २०१९ ते २०२१ ह्या दुसऱ्या टर्ममध्ये प्रचंड मताधिक्याने निवडून येताच जम्मू काश्मिर राज्याला स्वतंत्र राज्यघटना, स्वतंत्र ध्वज असे विशेष दर्जा देणारे ३७० कलम हटवण्याचा महापराक्रम जगातील सर्वात शक्तिशाली आणि लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने केवळ ७० दिवसांत केला. ३७० कलम असताना हिंदू पंडितांचा अनन्वित छळ आणि दहशतवाद यानी जम्मू काश्मीर मध्ये थैमान घातले होते;
आणि याउलट प्रखर राष्ट्रवाद काय असतो यांची वास्तव मांडणी करणारा चित्रपट “द कश्मिर फाईल्स” देशभरातील सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी संसदीय दलाच्या बैठकीत सुध्दा या सिनेमाची प्रशंसा केली आहे. आज गडहिंग्लज शहर आणि तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने राजे विक्रमसिंह घाटगे फौंडेशनच्या सहयोगाने, भाजपचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष आदरणीय राजे समरजितसिंह घाटगे यांच्या सहकार्याने सुभाष चित्रमंदिरात हा सिनेमा विनामुल्य प्रदर्शित करणेत आला. त्यावेळी गडहिंग्लज शहर आणि कडगाव कौलगे जिप मतदार संघातील बंधुभगिनीनी प्रचंड गर्दी केली होती. भाजपच्या वतीने शहरातील श्री लक्ष्मी मंदीरापासून सिनेमागृहापर्यंत रॅली काढण्यात आली.
त्या वेळी भारत माता की जय, वंदे मातरम् अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष विठ्ठल पाटील, शहर अध्यक्ष राजेंद्र तारळे, तालुका उपाध्यक्ष चंद्रकांत सावंत, पंचायत समिती उपसभापती प्रकाश पाटील, जि. प. सदस्या अनिता चौगुले, युवा अध्यक्ष संग्राम आसबे, उपाध्यक्ष अभिनंदन पाटील, कार्याध्यक्ष प्रितम कापसे, विठ्ठल भमानगोळ, सरचिटणीस अजित जामदार, उपाध्यक्ष वरुण गोसावी, भिकाजी पाटील, बाजीराव खोत, द्राक्षायणी घुगरी, निलांबरी भुईंबर, सोनाली घुगरी, संदिप कुरळे, मनिषा कुरळे, अर्चना रिंगणे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.