Monday, May 27, 2024
Homenewsनीट परिक्षेचे केंद्र बदलण्याचा पर्याय देण्याची मागणी न्यायालयाने फेटाळली

नीट परिक्षेचे केंद्र बदलण्याचा पर्याय देण्याची मागणी न्यायालयाने फेटाळली


पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या नीट (NEET) परिक्षेत केंद्र बदलण्याचा पर्याय देण्याची विनंती करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. कोरोना महारोगराईच्या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्र बदलण्याची परवानगी देण्यात यावी, अशी विनंती याचिकेतून करण्यात आली होती.
कोरोनाबाधितांच्या रूग्णसंख्येत होणारी घट लक्षात घेता आता सर्व ठिकाणे खुली केली जात आहेत. अशात या याचिकेवर विचार करण्याची कुठलीही आवश्यकता नाही, असे मत नोंदवत न्यायमूर्ती यू.यू.लळित यांच्या अध्यक्षतेखाली न्यायमूर्ती एस रवींद्र भट, न्यायमूर्ती बेला.एम.त्रिवेदी यांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळली. देशभरात शनिवार, ११ सप्टेंबर राेजी नीट (NEET) परीक्षा घेण्यात येणार आहे.


पात्र विद्यार्थ्यांना पर्याय नाही
जून २०२१ च्या परिक्षेकरीता पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना अधिसूचनेनूसार पर्याय देण्यात आला आहे. पंरतु, मार्चमध्ये पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना हा पर्याय देण्यात आला नाही. आता केरळ वरून दिल्लीपर्यंत सर्वप्रकारचा प्रवास त्यांना करावा लागेल, असा युक्तीवाद वरिष्ठ वकील मीनाक्षी अरोडा यांनी केला.


पंरतु, आता कुठल्या प्रकारच्या प्रवासावर कुठलेही निर्बंध नाही. विमानांची उड्डाणे देखील सामान्यरित्या सुरू आहेत. आता कुठल्याही स्वरूपाची बंदी नाही.

विमान प्रवासी दिल्ली वरून मद्रास, दिल्ली ते कोच्ची पर्यंतचा प्रवास करीत आहे. केरळवरून उड्डाण सुरू आहे.
काेराेना महारोगराईची गंभीरता एप्रिल तसेच मे महिन्यांप्रमाणे नाही.


केरळमध्ये कोरोनाची स्थिती गंभीर असली तरी तेथील जीवन सुरू आहे,असे खंडपीठाने यावेळी स्पष्ट केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -