Monday, May 27, 2024
HomenewsRajya Sabha Bypolls ; रिक्त जागांसाठी ४ ऑक्टोबरला पोटनिवडणूक होणार

Rajya Sabha Bypolls ; रिक्त जागांसाठी ४ ऑक्टोबरला पोटनिवडणूक होणार


Rajya Sabha Bypolls निवडणूक आयोगाने पाच राज्यांतील राज्यसभेच्या पोटनिवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. Rajya Sabha Bypolls देशातील महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू आणि मध्य प्रदेशातील रिक्त राज्यसभेच्या जागांवर ४ ऑक्टोबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाने गुरुवारी ही माहिती दिली.

आयोगाने पाच राज्यांमध्ये रिक्त झालेल्या ६ राज्यसभा जागांच्या निवडणुकीचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे.
निवडणूक आयोगानुसार, त्याची अधिसूचना १५ सप्टेंबरला जारी केली जाईल.
निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील काँग्रेस नेते राजीव शंकरराव सातव यांच्या निधनामुळे एका जागेवर पोटनिवडणूक होणार आहे.
काँग्रेसच्या युवा नेत्याचा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मृत्यू झाला होता.

आयएडीएमके (IADMK) नेते केपी मुनुसामी यांच्या राजीनाम्यामुळे तामिळनाडूतील राज्यसभेची जागा या वर्षी ७ मे २०२१ रोजी रिक्त झाली. त्यांचा कार्यकाळ २०२६ पर्यंत होता.
याशिवाय, तामिळनाडूमधूनच आर. वैथिलिंगम यांच्या राजीनाम्यामुळे राज्यसभेची एक जागा रिक्त झाली. ज्यांचा कार्यकाळ २०२२ पर्यंत होता.
६ मे २०२१ रोजी मानस रंजन भुनिया यांच्या राजीनाम्यामुळे पश्चिम बंगालमध्ये एक जागा रिक्त झाली.
मानस भुनिया आता ममता सरकारमध्ये मंत्री आहेत. याशिवाय बिस्जित दामरे यांच्या राजीनाम्यानंतर आसाममध्ये एक जागा रिक्त झाली. तर, मध्य प्रदेशातील थावरचंद गेहलोत यांनी राजीनामा दिल्यानंतर एका जागेवर पोटनिवडणूक होणार आहे.
निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार १५ सप्टेंबर रोजी अधिसूचना जारी केली जाईल.
२२ सप्टेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असेल.
अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख २७ सप्टेंबर आहे.
मतदान आणि मतमोजणी ४ ऑक्टोबरला होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -