रेशन कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी आहे. मोदी सरकारने रेशन कार्डधारकांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे रेशन कार्डसोबत नसताना सुद्धा तुम्हाला रेशन मिळणार आहे. मोदी सरकारने ही मोठी घोषणा केली आहे. संसदेमध्ये अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री पियुष गोयल यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, ‘यापुढे रेशन कार्डधारकांना रेशनची सुविधा घेण्यासाठी रेशन कार्ड दाखवण्याची गरज नाही.’ मोदी सरकारच्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
यापुढे रेशन सुविधा घेण्यासाठी रेशन कार्डसोबत ठेवणे गरजेचे नाही. आतापर्यंत रेशन धान्य दुकानात धान्य घेताना रेशन कार्डधारकांना रेशन कार्ड दाखवावे लागत होते. रेशन कार्ड दाखवल्यानंतरच त्यांना धान्य मिळत होते. पण आता रेशन कार्डधारकांना ते जिथे राहतात त्याठिकाणच्या जवळ असलेल्या रेशन धान्य दुकानात रेशन कार्ड नंबर आणि आधार नंबर सांगावा लागेल. त्यानंतर त्यांना रेशन मिळणार आहे. यापुढे त्यांना रेशनकार्ड सोबत ठेवावे लागणार नाही.
पियुष गोयल यांनी संसदेत दिलेल्या माहितीनुसार, रेशन कार्ड प्रक्रिया अधिक सोपी करण्यात आली आहे. देशात ‘वन नेशन वन रेशन कार्ड’ची (One Nation One Ration Card) सुविधा लागू करण्यात आली आहे. सरकारी आकडेवारीनुसार, आतापर्यंत देशात वन नेशन वन रेशन कार्डद्वारे 77 कोटी नागरिकांना जोडण्यात आले आहे. यात रेशन कार्ड वापरणाऱ्यांची संख्या 96.8 टक्के आहे. यामध्ये 35 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील लोकांना समावेश करण्यात आले आहे. या 77 कोटी नागरिकांना सरकारने रेशन कार्ड सुविधा अधिक सोपी केल्यामुळे फायदा होणार आहे.
सराकारने रेशनकार्ड प्रक्रिया सोपी केल्याचा सर्वात जास्त फायदा परराज्यात राहणाऱ्या नागरिकांना होणार आहे. महत्वाचे म्हणजे, एखाद्या व्यक्तीचे रेशनकार्ड त्याच्या मूळ राज्यात असेल आणि तो नोकरीनिमित्त दुसऱ्या शहरात आपल्या कुटुंबासह राहत असेल. त्यावेळी त्याला त्याचा रेशनकार्ड क्रमांक आणि आधार नंबरची माहिती देऊन कोणत्याही दुकानातून रेशन धान्य मिळवता येणार आहे. यासाठी यानागरिकांना त्यांचे मूळ रेशन कार्ड दाखवण्याची गरज नाही.