Saturday, March 15, 2025
Homeब्रेकिंगशिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून मोठा वाद, दोन गटात तुफान दगडफेक

शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून मोठा वाद, दोन गटात तुफान दगडफेक

छत्रपती शिवाजी महाराज यांची आज तिथीप्रमाणे जयंती देशभरात साजरी केली जात असताना तेलंगणात मोठा वाद उफाळून आला आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून दोन गटात झालेल्या तुफान दगडफेकीत अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये पोलिस कर्मचाऱ्यांचा देखील समावेश आहे. निझामाबाद जिल्ह्यातील बोधन शहरात ही घटना घडली आहे. दगडफेकीनंतर शहरात तणाव पसरल्याने पोलिसांनी कलम 144 (जमावबंदी) लागू केला आहे.

निझामाबाद जिल्ह्यातील बोधन शहरात शिवाजी महाराज यांचा पुतळा स्थापन करण्यात आला आहे. त्यावर दोन गटात तुफान हाणामारी झाली. त्यानंतर झालेल्या दगडफेकीत अनेक नागरिक जखमी झाले आहेत. जखमींमध्ये पोलिस कर्मचाऱ्यांचा देखील समावेश आहे. बोधन शहरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे. परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. शहरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -