Saturday, July 26, 2025
HomeसांगलीMiraj : प्रेमसंबंधाच्या संशयातून नरवाडमध्ये एकास मारहाण

Miraj : प्रेमसंबंधाच्या संशयातून नरवाडमध्ये एकास मारहाण

नरवाड (ता. मिरज) येथे प्रेमसंबंधाच्या संशयातून विरुपाक्ष बाळकृष्ण भंडारे यांना मारहाण करण्यात आली. याप्रकरणी विरुपाक्ष भंडारे यांनी राजू पांडुरंग भंडारे (रा. नरवाड) याच्या विरुद्ध मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, विरुपाक्ष भंडारे हे शुक्रवार, दि. 18 रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारासघराजवळ असलेल्या माळावर गेले होते. त्यावेळी राजू भंडारे हा त्या ठिकाणी आला.

त्याने विरुपाक्ष यांना “तुझे कोणाशी प्रेमसंबंध आहेत, तू का सारखा – सारखा इकडे येतोस”, असे म्हटले. त्यावेळी विरुपाक्ष यांनी “माझे तसे काही नाही”, असे सांगितल्याने दोघांत जोरदार वादावादी झाली. त्यावेळी राजू याने विरुपाक्ष यांना काठीने बेदम मारहाण
केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -