Monday, August 25, 2025
Homeराजकीय घडामोडीनवाब मलिकांचा तरुंगातील मुक्काम वाढला, 4 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी!

नवाब मलिकांचा तरुंगातील मुक्काम वाढला, 4 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी!

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. न्यायालयाने नवाब मलिक यांच्या कोठडीमध्ये वाढ केली आहे. नवाब मलिक यांची न्यायालयीन कोठडी आज संपली. त्यामुळे त्यांना आज मुंबई सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. सुनावणीदरम्यान न्यायालयाने नवाब मलिक यांच्या न्यायलयीन कोठडीमध्ये 4 एप्रिलपर्यंत वाढ केली आहे. त्यामुळे नवाब मलिक यांचा आर्थर रोड जेलमधील मुक्काम आणखी वाढला आहे.

आजच्या सुनावणीदरम्यान नवाब मलिक यांनी न्यायालयासमोर तीन अर्ज सादर केले होते. कमरेचा त्रास असल्यामुळे झोपण्यासाठी बेड उपलब्ध करून देण्यात यावा. चादर आणि बसण्यासाठी एक चेअर देण्यात यावी या मागण्यांचा अर्ज त्यांनी न्यायालयासमोर सादर केला होता. न्यायालयाने त्यांच्या या तिन्ही मागण्या मान्य केल्या आणि आर्थर रोड जेल प्रशासनाला सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -