हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार ३९५ वी जयंती आज (सोमवार) किल्ले रायगडसह महाड तालुक्यात मोठ्या जल्लोषात साजरी होत आहे. वैशिष्ट्य म्हणजे महिला वर्गाचा सहभाग यावर्षी मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. ऐतिहासिक खर्डी गावातील महिलांनी किल्ले रायगडावर जाऊन आज भल्या पहाटे शिवज्योत आपल्या गावी नेली. तर यावेळी एका ८० वर्षाच्या वृद्धेने शिवज्योत आणत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
खर्डी गावातील फौजी प्रशांत गोविंद राजेमहाडिक व फौजी प्रशांत भरत राजेमहाडिक यांच्या पुढाकाराने सुमित्रा गोविंद राजेमहाडिक (वय ८०) निर्मला यशवंत कदम (वय ५९) यांच्यासमवेत श्वेता संतोष भोसले, शिल्पा गोपीचंद राजेमहाडिक, पूनम प्रशांत राजेमहाडिक, कल्पिता समीर दळवी, सुचिता संदेश राजेमहाडिक, संगीता दिनेश मोहिते, शोभा पांडुरंग राजेमहाडिक, स्वाती अरूण घारे, रुपाली हरीश कदम, दिपाली प्रशांत राजे महाडिक, सारिका रामचंद्र राजेमहाडिक, शिवकन्या मेहेक आणि वैभवी तसेच छोटे मावळयांनी शिवज्योत आणली.