Tuesday, December 24, 2024
Homeक्रीडाIPL 2022: अनफिट दीपक चहरची जागा घेऊ शकतो CSK चा हा मराठमोळा...

IPL 2022: अनफिट दीपक चहरची जागा घेऊ शकतो CSK चा हा मराठमोळा खेळाडू

इंडियन प्रीमियर लीगच्या 15व्या हंगामाला 26 मार्चपासून सुरुवात होणार आहे. स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्जचा सलामीवीर रुतुराज गायकवाडने फिटनेस टेस्ट पास केल्याने संघाला मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू दीपक चहरची फिटनेस कर्णधार महेंद्रसिंग धोनीसाठी चिंतेचा विषय आहे. असे असले तरी चेन्नईच्या संघात असा एक खेळाडू आहे जो चहरची जागा भरून काढू शकतो.

भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणच्या मते चेन्नई सुपर किंग्जचा युवा खेळाडू राजवर्धन हंगरगेकर हा एक जबरदस्त प्रतिभा असलेला खेळाडू आहे. तो चहर परत येईपर्यंत त्याची जागा घेण्याची क्षमता ठेवतो. स्टार स्पोर्ट्सचा शो ‘गेम प्लॅन’मध्ये पठाणने हंगरगेकरच्या क्षमतेचे कौतुक केले. तो इतर कोणत्याही फ्रँचायझीमध्ये असता तर त्याची काळजी वाटली असती परंतु सीएसकेकडे एमएस धोनीसारखा कर्णधार त्याच्या मार्गदर्शनासाठी आहे असे पठाण म्हणाला.

अंडर-19 विश्वचषक 2022 मध्ये आपल्या जलद सीम-बॉलिंगने आणि खालच्या फळीतील चमकदार फलंदाजीने प्रभावित करणाऱ्या हंगरगेकरला गेल्या महिन्यात बेंगळुरू येथे झालेल्या मेगा लिलावात चेन्नईने 1.5 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. हंगरगेकर हा उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथील रहिवासी आहेत. उस्मानाबादसाठी चमकदार कामगिरी केल्यानंतर त्याची 2016-17 मध्ये विजय मर्चंट ट्रॉफीसाठी निवड झाली.अंडर 19 विश्वचषकात राजवर्धन हंगरगेकरने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य फेरीत 141.7 किलोमीटर प्रतितास वेगाने गोलंदाजी केली होती.

दरम्यान, कोलकाता येथे वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या T20I सामन्यात चहरच्या उजव्या हाताला दुखापत झाली होती. त्यानंतर तो आयपीएल स्पर्धेतून बाहेर पडण्याची शक्यता आहे. परंतु चहर परत येईपर्यंत सीएसकेला हंगरगेकरवर अवलंबून राहावे लागेल आणि या युवा खेळाडूला पाठिंबा द्यावा लागेल, असे मत पठाणने व्यक्त केले. पठाण म्हणाला “दीपक चहरसारखा दुसरा खेळाडू शोधणे सोपे नाही. चेंडू स्विंग करणे आणि लवकर विकेट घेण्याचे त्याचे कौशल्य असलेला गोलंदाज शोधणे सोपे नाही. तो तंदुरुस्त होताच प्लेइंग इलेव्हनमध्ये परत येईल. परंतु तोपर्यंत चेन्नईला हँगरगेकरवर अवलंबून राहावे लागेल. मला वाटते की तो असा खेळाडू आहे जो खरोखरच भरपूर क्षमता घेऊन आला आहे.”

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -