Monday, July 28, 2025
HomeमनोरंजनGully Boy फेम रॅपरचा धक्कादायक मृत्यू

Gully Boy फेम रॅपरचा धक्कादायक मृत्यू

ताजी बातमी ऑनलाईन टीम

रॅप म्युझिकच्या चाहत्यांसाठी दु:खद बातमी आहे. रॅपर धर्मेश परमार याचे वयाच्या अवघ्या 24व्या वर्षी निधन झाले आहे. अशी माहिती मिळते आहे की रॅपर धर्मेशन एका कार अपघातात जीव गमावला आहे. स्ट्रीट रॅपर कम्युनिटीमध्ये धर्मेश प्रसिद्ध होता, एमसी तोडफोड या नावाने तो प्रसिद्ध होता. त्याच्या गुजराती रॅपमुळे तो नावारुपास आला होता.



काही वर्षांपूर्वी आलेला सुपरहिट सिनेमा ‘गली बॉय’मध्ये धर्मेशने एका ट्रॅकसाठी रॅप साँग गायलं होतं. त्याचप्रमाणे हा प्रसिद्ध एमसी तोडफोड स्वदेसी (Swadesi Band) नावाच्या एका हिप-हॉप बँडचा भाग होता. या बँडने त्याचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताची पुष्टी केली आहे. दरम्यान त्याचा मृत्यू कशामुळे झाला याबाबत त्याच्या बँडकडून किंवा कुटुंबीयांकडून अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.



आज 21 मार्च रोजी सोमवारी या रॅपरवर अत्यंसंस्कार होणार आहेत. याबाबतची माहिती एमसी तोडफोडचा बँड स्वदेसीने दिली आहे. त्यांनी धर्मेशला श्रद्धांजली वाहण्यासाठी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. ज्यामध्ये त्यांनी धर्मेशच्या शेवटच्या परफॉर्मन्सचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार ‘स्वदेसी मेला’मध्ये धर्मेशने शेवटचा परफॉर्मन्स दिला होता. त्यांनी असं म्हटलं आहे की, ‘तू कधी विसरला जाणार नाहीस, तू तुझ्या संगीतातून नेहमी जिवंत राहशील.’

यावेळी त्यांनी धर्मेशच्या रॅपमधील काही ओळी देखील पोस्ट केल्या आहेत. या ओळी अशा आहेत- कभी सोचू कही चले जाने की दूर, कोई ठिकाने बस जाऊ जो ना ज्यादा मशहूर, जहाँ ले जाती रहे मन को भाए वो मैं करू, ऐसे जीना रहना किया मैंने यही से शुरू..’

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -