Tuesday, August 26, 2025
Homeब्रेकिंगपीएम किसान सन्मान निधी योजनेत मोठा बदल ! जाणून घ्या हप्ता परत...

पीएम किसान सन्मान निधी योजनेत मोठा बदल ! जाणून घ्या हप्ता परत करावा लागेल की नाही ?

ताजी बातमी ऑनलाईन टीम
पीएम किसान सन्मान निधी योजना सुरूवातीपासून आतापर्यंत यामध्ये आठ बदल करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी लाभार्थ्यांना E-Kyc करणे बंधनकारक केले होते. आता जे बदल झाले आहेत त्‍यानुसार, पात्र नसलेल्‍या लाभार्थ्यांकडून पैसे वसूल केले जावू शकतात. तसेच यामध्ये समजूही शकेल की तुम्‍ही पात्र आहेत की नाही, आणि हप्ता परत करावा लागेल की नाही.



पीएम किसान सन्मान निधी योजनेमधून लाखो शेतकऱ्यांनी 2000-2000 रुपयांचे अनेक हप्ते घेतले होते. यामध्ये कोणी कर भरत असूनही पैसे घेतले, तर कोणाच्या कुटुंबात पती-पत्नी दोघांनीही हप्ता घेतला. शेती पती-पत्नीच्या नावे असून ते एकत्र राहत असतील आणि कुटुंबातील मुले अल्पवयीन असतील तर या योजनेचा लाभ एकाच व्यक्तीला मिळू शकतो. यामध्ये जे लोक अपात्र आहेत, त्‍यांच्यावर कारवाई करण्यासाठी सरकारने वसुलीच्या नोटीसा पाठवण्यास सुरूवात केली आहे. तर यामध्ये काही लोकांना तुरुंगात जाण्याचीही वेळ आली आहे.


जर तुम्‍हाला तुंरूगात जायचे नसेल तर फसवूक करून पीएम किसान योजनेअर्तंगत घेतलेले पैसे परत केले पाहिजे. यासाठी सरकारकडून पोर्टलवर यांची सुविधा दिली आहे. यामध्ये पैसे ऑनलाईन पध्दतीने परत करता येतील.

तुम्‍हाला सर्वप्रथम https://pmkisan.gov.in/ या वेबसाईट जावे. यामध्ये शेवटी ऑनलाईन रिफंडसाठी बॉक्स असेल, त्यावर क्लिक करणे.

यामध्ये दोन पर्याय आहेत. एक जर पीएम किसान योजनेचे पैसे परत केले असतील, तर तपासावे आणि त्‍यानंतर सबमिट करावे. तसे नसेल तर दुसरा पर्याय तपासावा आणि सबमिट करावे.

यानंतर तुम्ही पात्र असाल तर कोणत्याही पैसे परत करण्यासाठी पात्र नाही असा मेसेज दिसेल. आणि तसे नसेल तर त्‍यामध्ये किती रक्कम परत करावयाची आहे हे दिसेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -