ताजी बातमी ऑनलाईन टीम
फुलेवाडी येथे जुन्या वादाचा राग मनात धरून सहा जणांनी विद्यार्थ्यांचा पाठलाग करून ब्लेड, चाकूने वार करून गंभीर जखमी केले. शनिवारी दुपारी हा प्रकार घडला. विश्वजीत भागोजी फाले (वय १६ वर्षे रा. फुलेवाडी,रिंगरोड) हा विद्यार्थी गंभीर जखमी झाला. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार विजय विठ्ठल लांबोरे (वय ३२), नागेश विठ्ठल लांबोरे (वय ३०),निवास गावडे , प्रकाश बबन बोडके (वय २५), लक्ष्मण -येडगे (वय १९), अर्जुन बोडेकर (वय १९ रा. सर्व बोंद्रेनगर, कोल्हापूर) या सहाजणांवर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
विश्वजीत फाले व कृष्णात गावडे यांच्यात वादावादी झाली होती. त्यानंतर शाळेचे मुख्याधापक,शिक्षक व क्लार्क असे तिघेजण फाले या विद्यार्थ्याला घरी सोडण्यासाठी जात होते. यावेळी विश्वजीत याच्या दुचाकीचा पाठलाग करून अर्जुन बोडकर याने फु ले वाडीजवळ फाले च्या दुचाकीला लाथ मारून खाली पाडले. त्यानंतर विजय लांबोरे,नागेश लांबोरे, प्रकाश बोडके यांनी ब्लेड,चाकूने विश्वजीतवर हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. फुलेवाडी रोडवर अरिहंत रेसिडेन्सी समोर हा प्रकार घडला. विश्वजीत फाले याने दिलेल्या फिर्यादीनुसार सहाजणांवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार कोळी पुढील तपास करीत आहेत.